स्वच्छ निळ्या आकाशा सारखी, नुकत्याच फुटणाऱ्या हिरव्या लवलवत्या कोवळ्या पालवी सारखी खळखळत्या झऱ्यासारखी, मुक्त वार्यासारखी, आपली मुले .त्यांच्या मनावर उत्तम संस्कार घडवून त्यावर अनेक सिद्धी सिद्ध प्रक्रिया करून एक सुसंस्कारित आनंदी, मूल्यवान ,बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडवणे म्हणजे मानवी संस्कृतीचे मूळ ध्येय. या दिशेनेच घरात कुटुंबीय ,शाळेत शिक्षक तर समाजात समाज घटक कायम कार्यरत असतात. आजच्या आधुनिक यंत्रयुगात वेगवान धावत्या जीवनात स्पर्धेच्या महाकाय जगात आपल्या नवीन पिढीला सक्षम करण्याबरोबर मानवी भावना संस्कार मूल्यासहीत परिपूर्ण करणे गरजेचे आहे. मुलांच्या वाढत्या वयामध्ये त्यांचे हसरे खेळते बालपण तर जपलेच पाहिजे पण त्याबरोबर आजच्या स्पर्धात्मक युगात आजूबाजूच्या परिस्थितीत दिनक्रमातून मुलांना स्वतःला सहजपणे सामावून घेण्याची कला साधली पाहिजे. . आपली भावी पिढी म्हणजे फक्त कुटुंबाचाच भाग नव्हे तर समाज आणि संपूर्ण राष्ट्राचा भविष्यवेध असे हे आपले भविष्य सुरक्षित सक्षम उज्वल दायी करण्यासाठी हा छोटासा परंतु कळकळीचा प्रयत्न आहे. मुलांचे भावविश्व इंद्रधनुषी असते मुलांच्या भावविश्वात रमण्याची त्यांच्याबरोबर शिकण्याची खेळण्याची संधी आपल्याला मिळते आपण गमावून कसे चालेल,?
माझा दृष्टिकोन अपेक्षा माझ्या मुलाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो हे सत्य मला प्रथम स्वीकारायला हवे. याशिवाय अशी दृष्टी बदलण्याचे माझे प्रयत्न योग्य दिशेने होणार नाहीत आणि मग आपण बोलू लागतो मुल बिघडले . तेव्हा दोष मुलाचा असतोच असे नाही. भोवतालचे वातावरण अगर घरातील परिस्थिती बिघडलेली असली तर त्या परिस्थितीला स्वाभाविक असा प्रतिसाद मुलं देत मुलाने त्रस्त होऊन वाईट परिस्थितीला दिलेल्या प्रतिसाद आलाच आपण मूळ बिघडले असे एक उदाहरण देऊन थोडक्यात सांगायचे झाले, तर दुधात मीठ टाकले तर दूध नसते पण तो दोष दुधाचा नसून ते दूध ज्याने व्यवस्थित झाकून ठेवले नाही त्याचा असतो . किंवा जाणून बुजून खोडसाळपणे मीठ टाकण्याचा असतो . कधी कधी आपल्याला दूध नासणार आहे असा अंदाज घेऊन आपण योग्य ती पावले उचलतो पण बरेचदा पालक अशी खबरदारी घेता ना आढळत नाहीत. दूध नासले तर आपण ते टाकून न देता त्याचे दही कमी किंवा आपल्याला जे जमेल ते बनवतो. आपण नासलेल्या दुधाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तसाच काहीसा दृष्टिकोन आपल्या बिघडलेल्या मुलाच्या बाबतीत ठरवणे गरजेचे आहे. बिघडलेले मुल सुधारू शकते. पूर्ववत होऊ शकते. खरेतर आपण सर्वांना बदलत्या परिस्थितीला तोंड देण्याच्या मुलांच्या क्षमतेबद्दल आदर वाटायला हवा. आपल्याला सततच्या वाढत्या अपेक्षा मुळे त्याच्यावर ताण येतोच. या व्यतिरिक्त घरातले वातावरण , माध्यमांचा वाढता प्रभाव, भपका याचे वाढते आकर्षण या सार्यांना तोंड देण्यासाठी खरेतर त्यांना सक्षम करायला हवे. त्या ऐवजी आपल्याला असे आढळते की , आपल्याच बळावर या साऱ्याला तोंड देत आहेत ही तारेवरची कसरत करत असताना त्यांच्या वागण्यात काही कमी अधिक झाले की मग मात्र आपण खडबडून जागे होतो आणि काळजी करू लागतो. म्हणून पालकांच्या या दोन बाजू आपण लक्षात घ्यायला हव्यात . मिळणारा निर्मळ आनंद आणि समस्या उभ्या राहिल्या ही होणारी मनाची उलघाल यांची दुहेरी गुंफण म्हणजे पालकत्व . मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद असायला हवा स्वतः तणावमुक्त असलेले पालक आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला मदत करू शकतात. आपल्या मुलांशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावग्रस्त पालका जवळ आपल्या भावना व्यक्त कराव्या असे वाटत नाहीत. त्यांच्या डोक्यातील नवीन कल्पना , विचार ,स्वतःच्या समस्या असणाऱ्या पालकाला सांगाव्याशा वाटत नाही.
आजची परिस्थिती अशी आहे की पालक आपल्या मुलांसाठी अनेक सुविधा द्यायला तयार असतात . चांगली शाळा , चांगले क्लासेस, छंदवर्ग , शिबिर वगैरे . आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं ही त्यामागची त्यांची प्रामाणिक भावना. पण नेमके काय द्यायचे आणि काय नाही द्यायचे हे न कळणारे पालक देखील अधिक आहेत . आपल्याला मिळल नाही हे मान्य . पण आपल्याला जे संस्कार मिळाले ते त्यांना मिळावेत म्हणून आपण काय करतो हे ते स्वतःला विचारतात का ?आपण जर आयुष्यभर सक्षमपणे , सुजाणपणे वावरत आहोत तर आपल्याला जे मिळालं ते आधी द्यावं आणि मग न मिळालेल्या गोष्टींकडे वळावं हे श्रेयस्कर . एकत्रित पणाची भावना रुजवा. छोट्या छोट्या सामाजिक कार्यक्रमात त्यांना सामील करा . समूहाची भावना त्यातून तयार होईल . अर्थात याच गोष्टी पालकांसाठी देखील लागू होतात . आपल्या समस्यांसाठी संपूर्ण समाजाचे एकत्र येणे हे देखील गरजेचे आहे . संवादाची कमतरता असते तेथे मांडीवर डोकं ठेवून हळुवार गप्पा हा मुंगी मांडी फिलॉसॉफी चा वापर हा यातलाच एक प्रकार आहे .
मला वाटतं जेव्हा जेव्हा नवीनता घेण्यात मी कमी पडते विचार मागे पडतात तेव्हा तेव्हा माझा तरुण मुलगा मला दिशा देतो, सावरतो , आधार देतो, मला शांत करतो. तेव्हा मी मनातल्या मनात या तरुणाईला ,माझ्या मुलाला थँक्स म्हणते . माझ्या या तरुण मुलाने विचारानं नवं भान दिलं काही विचार ऐकून मी दचकले , काही विचार पचायला जड असतात . काही विचार करणारे असतात . संवादाच्या नव्या वाटा मनातला विश्वास कमी होऊ लागतो . कारण मुलांबद्दलच्या ह्या आपल्याला वाटणाऱ्या अविश्वासाने मुलांनाही त्रास होतो . राग येतो आणि बोलणंच संपत . आपण घाबरतो कारण मनात भीती असते काही बरे वाईट केलं तर आणि मुलांशी नातं संवाद मोकळेपणा स्वातंत्र्य जिथे आहे त्यांच्याबाबतीत कितीतरी घरं अशी आहेत की मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना इतरांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागतं रहावं लागतं खाली मान घालून ऐकावं लागतं अशाही विचारांचा एक गट आहेत की आई-बाबा मी तशी ही विचारांचा आहे त्यांचा ही संवाद घडवून आणायला हवा ना त्यासाठी कधी लहान मुलांचे आई-बाबा असणार आहोत तर कधी मुलं आपली पालक होणार आहेत.
यावर सिमानी भाटकर यांनी सुंदर कविता लिहिली :
आधुनिकतेच्या जगात व्यस्त होते सगळे
बोलण्याचे साधन जिथे भ्रमणध्वनी बनले
थकले जीव जेव्हा घरट्याकडे परतले
पिल्लांपाशी बागडण्या ऐवजी भ्रमणध्वनी मध्ये गुंतले
ममता माया पाळणाघरे वा आयांपाशी थांबले
भक्कम मातेच्या सावल्यांना वृद्धाश्रमात नेऊन बसविले
आणि आधुनिक युगात कुटुंबाचे रूपच पालटले
आशा अन अपेक्षांच्या ओझ्याने कुणी प्राणास मुकले
दडपशाहीच्या भावनेने विक्षिप्त वाणी एकटे होऊन पडले
जुन्या सोबत नव स्वीकारताना बालपण हरवले
नात्यांचे पाश आता स्पर्धेत रंगले
जिंकण्याच्या आशेत आपलेपणाने खेळ विसरले
तु तु मी मी करता करता पाखरांच्या भांडणात पिल्लांचे अस्तित्व हरवले
स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचारात बदलले आणि मोकळेपणाने जगण्याचा आनंद घेणे विसरले
या कवितेच्या माध्यमातून त्यांना एवढेच सांगायचे आहे मुले ही देवाघरची फुले आहेत त्यांना समजून घेणे आवश्यक आहे त्यांच्यासोबत लहान होऊन जगा त्यांच्याशी बोला तुम्हालाही तुमचे बालपण परत मिळेल .
- लेखिकेचे नाव :- सौ.मानसी मंगेश सावर्डेकर.
- लेखाचे स्वरूप :- स्व लिखित.
- भ्रमणधवनी क्रमांक :- ९३२१२८६१०५
- ईमेल आयडी :-[email protected]