Dividend Stock: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक (Share Market Investment Tips) करत असाल तर तुम्हाला शेअर मार्केटची संपूर्ण माहिती असावी लागते. जर तुम्ही कोणत्याही माहितीशिवाय पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
काही स्टॉक असे असतात जे गुंतवणूकदारांना कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे देतात. पेनी स्टॉक टपरिया टूल्स लिमिटेडने (Taparia Tools Ltd.) आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा गुंतवणूकदारांना खूप फायदा होईल. कंपनीकडून 1 शेअरवर 20 रुपये लाभांश जाहीर करण्यात आला आहे. (Dividend Stock)
1 शेअरवर मिळाला तब्बल 200 टक्क्यांचा लाभांश
12 फेब्रुवारी रोजी, कंपनीने (taparia tools share price) स्टॉक एक्सचेंजला असे कळवले होते की 10 रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या या शेअरवर 200 टक्के अंतरिम लाभांश देण्यात येणार आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 20 रुपये इतका लाभांश मिळणार आहे. अशातच आता या लाभांशाची रेकॉर्ड तारीख 24 फेब्रुवारी 2024 निश्चित केली असून आता या दिवशी कंपनीचे शेअर्स असणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदारालाच लाभांशाचा लाभ मिळेल.
कंपनीने केले बोनस शेअर्सचे वितरण (Dividend Stock)
कंपनीने यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये एक्स-बोनस स्टॉक (Bonus Stocks) म्हणून व्यापार केला असून त्यावेळी कंपनीने 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स दिले होते. या कंपनीने 2002 मध्ये पहिल्यांदा लाभांश दिला असून त्यानंतर पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1 रुपये लाभांश मिळाला होता.
गुंतवणूकदारांना मिळत आहे नियमित अंतराने लाभांश
2023 मध्ये, कंपनीने दोनवेळा 155 रुपये लाभांश दिला होता. कंपनी नियमित अंतराने लाभांश देत असून कंपनीच्या या शेअर्सची किंमत शुक्रवारी 3.06 रुपये इतकी होती. हा देखील कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 52 आठवड्यांचा नीचांक 2.10 रुपये आहे. Taparia Tools Limited चे मार्केट कॅप रु 4.64 कोटी इतका आहे. दरम्यान, आता कंपनीच्या गुंतवणूकदाराला लाभांशचा फायदा होईल.