Discount on SUV : 1.79 लाखांनी स्वस्तात खरेदी करता येईल ‘ही’ शक्तिशाली एसयूव्ही, सेफ्टीमध्ये मिळालेत 5 स्टार रेटिंग

Discount on SUV : भारतीय बाजारात मागील काही दिवसांपासून SUV ची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे कार निर्मात्या कंपन्या देखील शानदार फीचर्स आणि मायलेज असणाऱ्या SUV लाँच करत आहेत. जर तुम्ही नवीन SUV खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही लाखो रुपयांच्या सवलतीत SUV खरेदी करू शकता.

1.79 लाख रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल Mahindra XUV300

महिंद्राच्या कॉम्पॅक्ट SUV XUV300 ची अनेक युनिट्स अजूनही शोरूममध्ये आहेत. तुम्ही जर ही कार खरेदी करायला गेला तर तुम्हाला यावर सर्वात मोठी सवलत मिळेल. कारण कार आता सवलतीत विकली जात आहेत. तुम्ही या महिन्यात XUV300 खरेदी केली तर तुम्हाला त्यावर 1.79 लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल. अशी सूट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण ही कार जबरदस्त आहे.

Mahindra XUV700 वर होईल 1.50 लाखांची बचत

तुम्ही या महिन्यात महिंद्राची XUV700 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनी या कारवर 1.50 लाख रुपयांची शानदार सवलत देत आहे. ही एसयूव्ही तिच्या आरामासाठी ओळखली जाते आणि सुरक्षेसाठी अनेक आश्चर्यकारक फीचर्स दिली आहेत.

Mahindra Scorpio-N वर मिळेल 1 लाख रुपयांची सूट

महिंद्राच्या स्कॉर्पिओच्या खरेदीवर तुम्हाला या महिन्यात 1 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळेल. ही SUV कौटुंबिक वर्गाला टार्गेट करते आणि त्यात स्पेसपासून शक्तिशाली इंजिनपर्यंत सर्व काही दिले आहे.

महिंद्रा बोलेरो निओवर देखील मिळेल 83 हजारांची शानदार सवलत

समजा तुम्ही बोलेरो निओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात कंपनी या वाहनावर 83 हजार रुपयांची सूट देत असून या एसयूव्हीला लहान शहरे आणि गावांमध्ये मोठी मागणी आहे. हे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सुरळीत चालते.

Leave a Comment