Digital Skills : जगभरात डिजिटायझेशन (Digital Skills) वेगाने वाढत आहे. आता लोक मागील वर्षांच्या तुलनेत इंटरनेटवर जास्त वेळ घालवत आहेत. लोकांच्या सवयींमध्ये सोशल मीडिया सर्फिंग, ऑनलाइन गेम आणि आवश्यक खरेदीचा समावेश होतो. यामुळेच सर्व बिझनेस-ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल मार्केटिंगला (Digital Marketing) एक प्रभावी माध्यम मानतात.
आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगचा जगातील टॉप 10 रोजगारांमध्ये समावेश झाला आहे. आज मोठ्या प्रमाणात कंपन्या, ब्रँड आणि कॉर्पोरेट क्षेत्राला डिजिटल मार्केटर्सची गरज आहे. कारण फक्त डिजिटल मार्केटर कंपनीच्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात सोशल मीडिया, ईमेल, वेबसाइट आणि सर्च इंजिनद्वारे मोठ्या संख्येने लोकांपर्यंत करू शकतो.
एका सर्वेक्षणानुसार, डिजिटल मार्केटिंग क्षेत्राचे भविष्य पुढील 100 वर्षांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. या सुरक्षित भविष्याकडे पाहता देशातील लाखो तरुणांची या क्षेत्राकडे ओढ वाढत आहे. जर तुम्हीही बेरोजगार असाल आणि चांगली नोकरी शोधत असाल तर तुम्हाला स्वतःला कौशल्य मिळणे आवश्यक आहे. कारण कंपन्या कुशल तरुणांना हाताशी धरून डिजीटल मार्केटिंग करत आहेत, मग उशीर कशाला तुम्हीही डिजीटलचे हे तंत्र शिकून चांगले उत्पन्न मिळवू शकता.
डिजिटल मार्केटर होण्यासाठी 7 आवश्यक कौशल्ये
कंटेंट रायटिंग
कंटेंट रायटर कंपनीच्या उत्पादनांची माहिती शब्दांद्वारे ग्राहकांना देतो. याद्वारे तुम्ही उत्पादनाविषयी ई पुस्तके, लेख, ब्लॉग पोस्ट तयार करून ग्राहकांना मार्केटिंग प्रोग्रामशी जोडू शकता.
कॉपीरायटिंग
डिजिटल मार्केटर ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर घेण्यासाठी कॉपी रायटिंग (Copy Writing) वापरतात. विक्री वाढविण्यासाठी हे एक चांगले साधन आहे.
SEO (Search Engine Optimisation)
सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन महत्त्वाचे कौशल्य आहेत जे डिजिटल मार्केटरकडे असणे आवश्यक आहे. याद्वारे डिजिटल मार्केटर गुगल सर्चमध्ये उत्पादनाची रँकिंग वाढवू शकतो.
Social Media Marketing
सध्या एखादे उत्पादन किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग हे खूप चांगले माध्यम आहे. यासोबतच कंपन्या किंवा ब्रँड्सही ई-मेल मार्केटिंगद्वारे ग्राहकांशी थेट संपर्क साधतात.
Graphic Design
ग्राहकांना कोणताही संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याचा किंवा त्यांचे लक्ष वेधण्याचा व्हिज्युअल डिझाइन हा एक चांगला मार्ग आहे. डिजिटल मार्केटर्स कंपनीचे उत्पादन किंवा आयडीया शब्दांशी जोडून ग्राहकापर्यंत पोहोचवितात.
Market Research Analyst
प्रत्येक कंपनीचे टार्गेट मार्केट असते, ज्यासाठी मार्केट रिसर्च अॅनालिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात. ते ग्राहकांशी संबंधित डेटाचे विश्लेषण करतात. ज्याचा वापर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी केला जातो.
Perfect Communication
डिजिटल मार्केटर्स लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी प्रभावी संवादाचा वापर करतात. मग ते डायरेक्ट मेसेजिंग असो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, रेडिओ किंवा टीव्ही. डिजिटल मार्केटर म्हणून, तुमच्याकडे लेखन आणि संवाद कौशल्ये चांगली असली पाहिजेत.