Digital Currency : १ नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्यात आलेल्या आरबीआयच्या (RBI) डिजिटल चलनाची (Digital Currency) चांगली सुरुवात झाली आहे. सीबीडीसीच्या (CBDC- Central Bank of Digital Currency) पायलट प्रोजेक्ट अंतर्गत, बँकांना सरकारी सिक्युरिटीजच्या व्यवहारांसाठी (Transactions in Government Securities) म्हणजे सरकारी सिक्युरिटीज फक्त घाऊक विभागातील बँकांना वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या पथदर्शी प्रकल्पात नऊ बँकांचा सहभाग आहे. यापैकी बर्याच बँकांनी लाँचच्या पहिल्याच दिवशी डिजिटल आभासी चलन वापरून सरकारी रोख्यांसह ४८ व्यवहार केले असून त्यांचे मूल्य सुमारे २७५ कोटी रुपये आहे.
- SEBI News : म्हणून ८२ कंपन्यांना २२.६४ कोटींचा दंड : ४५ दिवसांत दंड भरायची सेबीची सक्ती
- Share Market Updates ; यामुळे चार दिवसांचा विजयी सिलसिला तुटला : निफ्टी १८१०० च्या खाली
- Q2 Result : “या” कंपनीचा एकत्रित वार्षिक नफा ६८.५% वाढून १६७७.४८ कोटी रुपयांवर पोहोचला
- Digital Currency : आरबीआय गव्हर्नरने केली “ही” मोठी घोषणा
- IPO Beaking : लवकरच येणार “या” चार कंपन्यांचे आयपीओ
क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL) ने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, सीबीडीसी (CBDC) वापरून एकूण ४८ ट्रेड सेटल (Settle trade) केले गेले. यापैकी, २०२७ मध्ये ७.३८% उत्पन्न देणार्या सिक्युरिटीजचे २४ सौदे (deals) परिपक्व होतील आणि ७.२६% उत्पन्न देणार्या सिक्युरिटीजचे २३ व्यवहार २०३२ मध्ये परिपक्व होतील. २०३२ मध्ये ७.४५% च्या उत्पन्नावर ६.५४% सिक्युरिटी मॅच्युरिंगवर (Security Maturing) एक ट्रेड अंमलात आला. हे व्यवहार थेट आरबीआयद्वारे (RBI) सेटल केले जातील, इतर ट्रेड्सच्या विपरीत जेथे ‘सीसीआयएल’ला (CCIL) व्यवहार शुल्क दिले जाते, हे व्यवहार विनामूल्य असतील.
‘आरबीआय’ने (RBI) सध्या ‘सीबीडीसी’ला पायलट प्रोजेक्ट म्हणून मान्यता दिली आहे. भविष्यात ते अनेक टप्प्यांत पुढे नेले जाईल. या दरम्यान प्रत्येकाला त्रुटी दूर करून वापरण्याची परवानगी दिली जाईल. ज्या नऊ बँकांना सुरुवातीला ‘सीबीडीसी’च्या (CBDC) पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), युनियन बँक ऑफ इंडिया (Union bank of india), एचडीएफसी (HDFC) बँक, आयसीआयसीआय (ICICI Bank) बँक, कोटक महिंद्रा बँक (Kotak mahindra bank), येस बँक (YES Bank), आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC first bank) आणि एचएसबीसी HSBC या बँकांचा समावेश आहे.
पहिला करार आयसीआयसीआय (ICICI Bank) बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC first bank) यांच्यात रुपये ५ कोटींमध्ये झाला.