Diesel Price : देशातील वाढत्या तेलाच्या किमती(Oil prices) नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने (Government) आणखी एक पाऊल उचलले आहे. गुरुवारी केंद्र सरकारने (Central government) डिझेलच्या (Diesel) निर्यातीवरील विंडफॉल प्रॉफिट टॅक्स 7 रुपये प्रति लिटरवर वाढवला. तसेच, विमान इंधनावर (ATF) 2 रुपये प्रति लिटर कर पुन्हा लागू करण्यात आला आहे. मात्र, सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील कर कमी केला आहे.
Government Scheme: ‘या’ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लॉटरी ; सरकारने करणार ‘ही’ मोठी घोषणा https://t.co/Ff4PY1ygzZ
— Krushirang (@krushirang) August 18, 2022
डिझेलच्या निर्यातीवरील करात 2 रुपयांनी वाढ
विंडफॉल टॅक्सच्या तिसऱ्या पंधरवड्याच्या आढाव्यात सरकारने डिझेलच्या निर्यातीवरील कर 5 रुपयांवरून 7 रुपये प्रति लिटर केला आहे. एटीएफवर पुन्हा एकदा प्रति लिटर 2 रुपये कर लावण्यात आला आहे. गेल्या महिन्यात, सरकारने ATF निर्यातीवर विंडफॉल नफा कर (लेव्ही) रद्द केला. याशिवाय, देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील कर 17,000 रुपये प्रति टन वरून 13,000 रुपये प्रति टन करण्यात आला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
वास्तविक, कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून नफा वाढल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे देशांतर्गत उत्पादित तेलाच्या करात कपात करण्यात आली. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.
Rakesh Jhunjhunwala नंतर पुढचा बिग बुल कोण? ‘या’ व्यक्तीचे नाव आघाडीवर https://t.co/ZWH3YdrBcG
— Krushirang (@krushirang) August 18, 2022
तथापि, शुक्रवारी सकाळी किमतीत किंचित वाढ झाली आणि डब्ल्यूटीआय क्रूडचे दर प्रति बॅरल $ 90.74 च्या पातळीवर दिसले. त्याच वेळी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 96.77 वर पोहोचली. येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात.