Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे हे पेय, होईल रक्तातील साखर नियंत्रित

Diabetes : अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यातील अनेक आजार हे जीवघेणे असतात. त्यामुळे वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह हा घातक आजार असून तुम्ही जर काही पेय घेतली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.

लिंबूपाणी

लिंबूपाणी हे एक नैसर्गिक पेय असून जे घरी सहज तयार केले जाऊ शकते. हे लक्षात ठेवा की त्यात साखरेचे प्रमाण शून्य आहे, जरी स्टीव्हियासारखे साखर मुक्त स्वीटनर गोडपणासाठी वापरता येईल.

पाणी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पाणी हा सर्वोत्तम पर्याय असून ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही. योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज लघवीद्वारे काढून टाकले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे.

ग्रीन टी

हे लक्षात घ्या की अनेक संशोधकांमध्ये हे सिद्ध झाले आहे की ग्रीन टीचा तुमच्या सामान्य आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. ग्रीन टीचे दररोज सेवन केले तर टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांचे आरोग्य सुधारले जाते.

कॉफी

कॉफी प्यायली तर साखरेचे चयापचय सुधारून टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होण्यासही मदत होते. त्यात थोडीशीही साखर न घालण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान सहन करावे लागू शकते.

कमी चरबीयुक्त दुधाचे सेवन

हे लक्षात घ्या की दुधामध्ये महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, पण ते आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्स समाविष्ट करते. पण नेहमी वापरासाठी ते दूध निवडा ज्यात साखर नाही आणि कमीत कमी फॅट आहे. एका दिवसात 2 ते 3 ग्लास लो फॅट असणारे दूध प्यावे.

Leave a Comment