Diabetes : सकाळी रक्तातील साखर वाढते? नाश्त्यात करा या पदार्थांचा समावेश, मिळेल आराम

Diabetes : अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत त्यामुळे त्यांना अनेक आजारांचा समान करावा लागतो. यातील काही आजार जीवघेणेदेखील असू शकतात. यातील एक गंभीर आजार म्हणजे मधुमेह. अनेकांच्या सकाळी रक्तातील साखर वाढते. तुम्ही त्यावर मात मिळवू शकता.

एवोकॅडोमधील अँटिऑक्सिडंट तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोमपासून वाचवतात. या सिंड्रोमने त्रस्त लोकांमध्ये टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका येतो. अशा वेळी रोज नाश्त्यात एवोकॅडोचे सेवन केले तर साखरेची पातळी वाढणार नाही. ग्लायसेमिक इंडेक्स, फायबर आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडमुळे साखरेची पातळी राखली जाते. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

अनेक मधुमेही रुग्ण मासे खाणे टाळतात. माशांमुळे साखरेची पातळी वाढली जाते, असा त्यांचा समज असतो. माशांमध्ये असणारे प्रथिने संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा प्रदान करतात. यात असलेले ओमेगा ३ आपल्या हृदयासाठी फायदेशीर असून व्हिटॅमिन डी तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते. तुम्ही आहारात माशांचा समावेश करून शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकता.

हिरव्या पालेभाज्यांत फायबर, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक असून या सर्व भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स 1 पेक्षा कमी आहे, जो साखरेची पातळी वाढवण्याइतपत कमी आहे. अशा वेळी रोज नाश्त्यात याचे सेवन करून तुम्ही मधुमेहापासून लांब राहू शकता.

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असून ते आपल्या पोटातील एंजाइम कमी करण्यास मदत करते ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. याचे दररोज सेवन केले तर तुमच्या शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता वाढेल. तुम्ही दररोज 40 मिली पाण्यासोबत सुमारे 20 मिली सफरचंद सायडर व्हिनेगर घेतले तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील.

Leave a Comment