Diabetes : सावधान! मधुमेही रुग्णांना असतो स्ट्रोकचा धोका, ‘या’ लक्षणांकडे द्या लक्ष

Diabetes : अनेकांना मधुमेहाचा सामना करावा लागतो. मधुमेह हा एक घातक आजार आहे, या आजाराकडे वेळीच लक्ष दिले नाही तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा हा आजार जीवघेणा देखील ठरतो.

मधुमेह असणाऱ्यांना आहाराची काळजी घ्यावी लागते. मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काही लक्षणांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

का असतो स्ट्रोकचा धोका?

हे लक्षात घ्या की मधुमेहामुळे शरीराची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता आणि त्याचा वापर प्रभावित होत असून इन्सुलिनचे काम रक्तातून ग्लुकोज घेणे आणि ते पेशींपर्यंत पोहोचवणे हे आहे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण जेव्हा इन्सुलिन नीट काम करत नाही तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते.

जास्त वेळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहिले नाही तर रक्तवाहिन्यांमध्ये साखर साचून गुठळ्या किंवा चरबीचे साठे तयार होऊ लागतात. या गुठळ्या मान आणि मेंदूकडे जाणाऱ्या वाहिन्यांमध्ये तयार होतात. असे झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचित होऊ लागतात आणि पक्षाघाताचा धोका देखील वाढत जातो.

जाणून घ्या स्ट्रोकची लक्षणे

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्ट्रोकच्या लक्षणांवर ताबडतोब उपचार केला तर धोका कमी करता येतो. स्ट्रोकनंतर पुढील लक्षणे शरीरात दिसू लागतात.

  • मनात गोंधळ किंवा भ्रम
  • चेहऱ्याच्या एका बाजूला अशक्तपणा, सुन्नपणा जाणवणे
  • बोलण्यात अडचण
  • अशक्त वाटणे
  • एक किंवा दोन्ही डोळ्यांनी पाहण्यात अडचण
  • शरीराचा समतोल राखण्यात अडचणकोणत्याही कारणाशिवाय डोकेदुखी
  • चालण्यात अडचण

Leave a Comment