Devendra Fadnavis । फडणवीसांकडून मोठं गिफ्ट, वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात कमालीची वाढ

Devendra Fadnavis । वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ केली आहे. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे.

मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ दिली असल्याची माहिती उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज सह्याद्री अतिथी गृह येथे वीज कंपन्यांमचे अधिकारी आणि कर्मचारी बैठकीत ते बोलत होते. बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तीनही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

“विशेष म्हणजे तीनही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यामध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले असून सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधीकरीता 5 हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा 500 रुपयांचा भत्ता आता 1000 रुपये केला आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Leave a Comment