Demat News : देशाच्या शेअर बाजारांमध्ये (stock market) गुंतवणूकदारांची (Investors) संख्या सतत वाढत आहे. जुलै ते सप्टेंबर (July to september) २०२२ या तिमाहीत सीडीएसएलची (CDSL- Central Depository Services India) ४८ लाख डिमॅट खाती (Demat account) उघडण्यात आली. हे आकडे सिद्ध करतात की भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये (Indian stock exchange) सहभागी होणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.
- SEBI News ; म्हणून “त्या” कंपन्यांवर सेबीने घातली बंदी
- Samvat 2079 : या वर्षात भारतीय शेअर बाजार सगळ्यांना टाकणार मागे
- Banking News : बाबो… “त्या” बँकेच्या नफ्यात झाली ३७ टक्क्यांनी वाढ
- PMC Exam Result News : अबब… तब्बल 180 गुण घेऊन पास झाला उमेदवार
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडियानुसार, ( सीडीएसएल) आर्थिक वर्ष (Financial year) २०२२-२३च्या सप्टेंबर तिमाहीत (quarter) ४८ लाख डिमॅट खाती उघडण्यात आली. आशियातील (Asia) ही पहिली आणि एकमेव सूचीबद्ध डिपॉझिटरी (Listed Depository) आहे. सीडीएसएल ऑगस्ट २०२२ मध्ये ७ कोटी डिमॅट खाती (Demat Acoount) असलेली पहिली डिपॉझिटरी (First Depository) ठरली.
गेल्या आठवड्यात, सेंट्रल डिपॉझिटरीने (Central Depository) ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या सहामाहीचे आर्थिक निकाल (Half-yearly financial results) जाहीर केले. या कालावधीत, डिपॉझिटरीचे एकूण उत्पन्न वार्षिक (Annual income) आधारावर ७ टक्क्यांनी वाढून ३१६ कोटी रुपये झाले, तर २०२२-२३ (एप्रिल-सप्टेंबर) च्या पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा ८ टक्क्यांनी घसरून १३८ कोटी रुपयांवर आला. त्याच वेळी, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत एकूण उत्पन्न तीन टक्क्यांनी वाढून रु. १७० कोटी झाले, तर निव्वळ नफा ७ टक्क्यांनी घसरून रु. ८० कोटी झाला. सीडीएसएलचे (CDSL) एमडी (MD) आणि सीईओ (CEO) नेहल व्होरा यांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सीडीएसएलचे Q2 (Quarter 2) चे निकाल जाहीर केले आणि त्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सीडीएसएल (CDSL) ही देशातील डिपॉझिटरी (Depository) आहे. हे गुंतवणूकदारांचे शेअर्स (Shares), बॉण्ड्स (Bonds), डिबेंचर (Debenture) आणि सिक्युरिटीज 9Secirities) कागदी स्वरूपात न ठेवता इलेक्ट्रॉनिक (Electronic) स्वरूपात सुरक्षित करते. सीडीएसएल (CDSL) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE- Bombay Stock Exchange) साठी काम करते. भारतातील ही दुसरी डिपॉझिटरी आहे. त्याचे मुख्यालय (Headquarters) मुंबईत असून ही एक प्रकारची शेअर बँक (share Bank) आहे.