Delhi News: नमाज अदा करणाऱ्यांना पोलिसाने मारली लाथ, करण्यात आलं निलंबित

Delhi News : आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आज दुपारी दिल्लीच्या इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांसोबत एका पोलिसाने चुकीचे वर्तन केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

‘या’ पक्षाकडून नाना पाटेकर लढणार लोकसभा निवडणूक, गोविंदा, राज बब्बर यांना काँग्रेस देणार संधी?

प्रकरण काय

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिस चौकीचा प्रभारी अधिकारी शेजारच्या मशिदीजवळ नमाज अदा करणाऱ्या काही लोकांना हटवण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान नमाज अदा करणाऱ्या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर पोलीस नमाज अदा करणाऱ्या व्यक्तीला लाथ मारतो.

Tata Motors ची मोठी घोषणा, ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळणार तब्बल 3 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट

आणखी एका व्हिडिओमध्ये तोच पोलीस नमाज पढणाऱ्या लोकांना हिंसकपणे धक्काबुक्की करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स आता सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

आरोपी पोलिस कर्मचारी निलंबित

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलिसावर कारवाई केली आहे. डीसीपी (उत्तर) मनोज मीना यांनी सांगितले की, पोलिस कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. डीसीपी मनोज मीणा यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवारांना धक्का! रोहित पवारांवर ‘त्या’ प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; साखर कारखाना जप्त

Leave a Comment