नवी दिल्ली : दिल्ली एमसीडी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टीने 250 प्रभागांसाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यावेळी पक्षाने अनेक विद्यमान नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे. यासोबतच निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणी करणाऱ्या नेत्यांना यामुळे जोरदार झटका बसला आहे. त्यामुळे ते कमालीचे नाराज झाले आहेत. निवडणुकीपूर्वी नाराज नगरसेवकांचे मन वळवणे हे आम आदमी पार्टीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
आम आदमी पार्टीचे प्रभारी दुर्गेश पाठक यांनी सर्वेक्षण आणि जनतेच्या प्रतिक्रियांच्या आधारे आम्ही तिकीट दिल्याचे म्हटले आहे. तथापि, मला माहित आहे की ती व्यक्ती तिकीट न मिळाल्याने थोडी नाराज आहे. पण आम्ही सर्व लोकांशी बोललो आहोत. यासोबतच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजांबरोबर संवाद साधला आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या सार्वजनिक प्रतिक्रियांनुसार, एमसीडी निवडणुकीत 230 हून अधिक जागा जिंकल्या जातील.
आम आदमी पार्टीने एमसीडी निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. पक्षाने एकूण उमेदवारांमध्ये 55.2 टक्के महिला उमेदवारांना संधी दिली आहे. MCD मध्ये 250 जागांपैकी 125 जागा महिलांसाठी राखीव आहेत, मात्र महिलांसाठी राखीव जागांव्यतिरिक्त आम आदमी पार्टीने 13 सर्वसाधारण जागांवर महिलांना तिकीट दिले आहे. MCD मध्ये एकूण 250 जागा आहेत. एमसीडी निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला मतदान होणार असून ७ डिसेंबरला निकाल लागणार आहेत.
दरम्यान, आम आदमी पार्टीने गुजरात विधानसभा निवडणुकीचीही जोरदार तयारी केली आहे. येथे पक्षासमोर भाजप आणि काँग्रेसचे मोठे आव्हान आहे. मात्र, त्याआधी दिल्लीतही एमसीडी निवडणूक होत आहे. या स्थानिक निवडणुकीतही पक्षासमोर नाराज उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पक्षाला एकाच वेळी या दोन्ही आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
- वाचा : AAP : भाजपला झटका देण्याचा ‘आप’ने तयार केला प्लान; पहा, काय आहे केजरीवालांचे राजकारण
- AAP : गुजरातमध्ये ‘आम आदमी’ जोरात..! केजरीवालांनी केलाय ‘हा’ खास प्लान; काँग्रेसला बसणार झटका