मुंबई : सध्या प्रत्येक भारतीयाचं महत्त्वाचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड… पॅन कार्डसोबतच कित्येक सरकारी योजना या ‘आधार’सोबत लिंक करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारने जातीचा दाखला (Caste Certificate) आणि उत्पन्नाचा दाखलाही (Income Certificate) ‘आधार कार्ड’शी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासकीय योजनांचे पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जातीचा व उत्पन्नाचा दाखला आधार कार्डला जोडल्यामुळे सरकारला ‘ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम’ राबवता येणार आहे.. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Student Scholarship) वाटण्याचं काम सोपं होणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांनी विद्यार्थ्यांचा जातीचा व उत्पन्नाचा दाखला ‘आधार’ला लिंक करण्याचं काम पूर्ण केलंय. त्यामुळे या राज्यापासूनच केंद्र सरकार ही सुविधा सुरू करणार असल्याचं सांगितलं जातं..
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर मिळणारी शिष्यवृत्ती व्यवस्था पूर्णपणे डिजिटल करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. त्यावर काम करत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात ही योजना अंमलात आणायचं उद्दिष्ट ठेवलं आहे. शिष्यवृत्ती योजनांमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला नेमकी कोणती शिष्यवृत्ती मिळेल, याचीही माहिती नसते. काही संस्थांनी एकाच बँक खात्याला 10 ते 12 विद्यार्थ्यांची नावं जोडली आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीचा पैसा विद्यार्थ्यांऐवजी संस्थांकडे जात होता. मात्र, या योजनेमुळे शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
देशातील 60 लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. विविध कार्डं परस्परांना लिंक करण्यामागे ‘एकात्मिक रचना’ निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश आहे. परदेशात अशा यंत्रणा योग्य पद्धतीने चालवल्या जातात, त्याचा फायदा तिथल्या नागरिकांना होतो. त्याचप्रमाणे सरकारशी संबंधित सर्व कामं कमी वेळात आणि सुरळीत व्हावीत, यासाठी ही एकात्मिक रचना निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचं सांगण्यात आलं..
लग्नासाठी मुलगी पाहताय..? आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…!
उन्हाळ्यात लिंबाने दिलाय झटका..! ‘त्यामुळे’ लिंबाचा पडलाय दुष्काळ, वाढलेत भाव; जाणून घ्या..