मुंबई : राज्यात सध्या विजेची मागणी 28 हजार मेगावॅटच्या आसपास आहे. गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाका वाढल्याने पुढील काही दिवसांत विजेची मागणी 30 हजार मेगावॅटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासमोर भारनियमनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे.. राज्य सरकारच्या मुख्य अभियंत्यांनी भारनियमाची यादीच जाहीर केली आहे. त्यानुसार दिवसा आठ तास किंवा रात्री आठ तासांची वेळ निश्चित करण्यात आलीय. यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढण्यात आलं आहे..
एकीकडे भारनियमनाचे संकट समोर असताना राज्यातील नागरिकांना आणखी एक धक्का बसणार आहे. तो म्हणजे, महावितरणने घरगुती विजेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईने सामान्य नागरिकांचं कंबरडं आधीच मोडलेलं असताना, त्यात आता महावितरणने घरगुती वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिला आहे..
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोळशाचे दर वाढल्यामुळे ग्राहकांवर 10 ते 60 रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. महावितरणच्या ग्राहकांना प्रति युनिट 10 पैसे ते 25 पैसे जादा मोजावे लागणार आहेत. त्यामुळे 100 युनिटपर्यंत 10 रुपये, तर 300 युनिटपर्यंत 60 रुपयांचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे.
कोळसा व गॅसच्या किमती नवीन उच्चांक गाठत असताना, महाराष्ट्र वीज नियामकाने सर्व कंपन्यांना संपूर्ण राज्यासाठी वीज दर वाढवण्यास परवानगी दिली आहे. विक्रमी उच्च इंधन दरांचा हवाला देऊन उच्च वीज दरांना परवानगी देणाऱ्या राज्यांच्या वाढत्या यादीत महाराष्ट्रही आता सामील झाला आहे.
डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात वीज खरेदीवरील वाढीव खर्च वसूल करण्यासाठी मार्च ते मे 2022 या काळातील वीजवापरावर महावितरणच्या वीजग्राहकांवर इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहे. त्यामुळे वीज बिलात भर पडणार आहे. मार्चमधील वापराची महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दरमहा वाढीव बिलाचा भार सोसावा लागणार आहे.
कर्नाटक सरकारने आपल्या ग्राहकांना 1 एप्रिलपासून अतिरिक्त 35 पैसे प्रति युनिट अदा करणार्या ग्राहकांसाठी उच्च दराची परवानगी दिली. तेलंगणाने पाच वर्षांच्या अंतरानंतर 50 पैसे प्रति युनिटने वीज दर वाढवला, तर आंध्र प्रदेशने देखील 1.57 रुपयांपर्यंत वीज दर वाढवला आहे. त्यात आता महाराष्ट्राचीही भर पडली आहे..
कोण होणार पाकिस्तानचा नवा पंतप्रधान ? ; विरोधकांकडून ‘या’ उमेदवाराचे नाव फायनल; जाणून घ्या..
Russia Ukraine War : आता युक्रेननेही रशियावर केली मोठी कारवाई; रशियाला ‘तसा’ बसणार फटका..