पुणे : कोरोना महामारीमुळे आधीच अनेकांवर आर्थिक संकट आले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, काहींचे धंदे बसले.. महागाईने सर्वसामान्य जनतेचा खिसा खाली झालेला असताना, ठाकरे सरकारने हतबल झालेल्या नागरिकांच्या खिशात हात घातला आहे..
वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांसाठी मागील काही दिवसांत सरकारने मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वाढवली होतीच.. मात्र, त्यावरही समाधान न झाल्याने राज्य सरकारने वाहतुकीच्या प्रलंबित गुन्ह्यांवरही दहा पट दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यात हेल्मेट न वापरण्याच्या गुन्ह्याचाही समावेश असल्याने, आडमार्गाने हेल्मेट सक्ती आणण्याचा तर सरकारचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे..
राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रलंबित ई-चालानवरही आता नवीन दंड आकारण्यात येणार आहे. याअंतर्गत लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास 500 रुपयांचा दंड प्रलंबित असेल, तर त्यावर आता 5 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत वाढीव दंड आकारण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. ही सूचना फक्त तडजोड शुल्काशी संबंधित आहे. हेल्मेट न घातल्यास 500 रुपयांच्या दंडासह तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाणार आहे.
विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या चालकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. वाहनाचा नंबर किंवा फॅन्सी नंबर प्लेट, रिफ्लेक्टर किंवा टेललाइटमध्ये छेडछाड केल्याबद्दल 1,000 रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. सर्व गुन्ह्यांसाठी पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी 1,500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
हेल्मेट दंडात वाढ झालेली नाही, पण राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हेल्मेट न घातल्याच्या पहिल्या प्रकरणात दंडात वाढ केलेली नाही. सध्या 500 रुपये दंड आकारला जात असून, तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणार आहे. मात्र, हेल्मेट न घालण्याचा दुसरा गुन्हा आढळल्यास संबंधित व्यक्तीला १५०० रुपये भरावे लागणार आहेत..
शहरात एकापेक्षा जास्त गुन्ह्यांसाठी प्रलंबित दंडांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात प्रामुख्याने हेल्मेटच्या दंडाचा समावेश आहे. हेल्मेटच्या पहिल्या गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला 500 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी 1500 रुपये भरावे लागणार आहेत. राज्यातील वाहतूक पोलिसांची ई-चलान प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले..
‘मारुती’ पाठोपाठ ‘टाटा मोटर्स’नी वाढविल्या वाहनांच्या किंमती, किती रुपयांनी होणार वाढ, वाचा..!
चीनला पुन्हा झटका.. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियानेही घेतलाय ‘तो’ निर्णय; पहा, काय सुरू आहे जागतिक राजकारणात