मुंबई : जगभरात सध्या सेमी कंडक्टरच्या टंचाईने वाहन उद्योग हैराण झाला आहे. सेमी कंडक्टर उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने अनेक वाहनांसाठी नागरिकांना वाट पहावी लागत आहे. बुकिंग केल्यानंतर कार येण्यासाठी कित्येक महिने थांबावे लागत आहे. त्यामुळे हैराण होऊन अनेक जण बुकिंग रद्द करत आहेत. नवीन बुकिंगही कमी झाली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र, वाहन उद्योगास डिसेंबर महिना चांगला ठरला आहे. या संकटानंतरही कार कंपन्यांनी 2021 मध्ये 30 लाखांहून अधिक कार विकल्या, तर 2020 मध्ये हा आकडा 24 लाख वाहनांचा होता, असे अहवालात दिसून आले आहे.
या काळात देशातील प्रमुख कार उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली. मारुती सुझुकीने डिसेंबर 2021 मध्ये सर्वाधिक वाहनांची विक्री केली. कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये 1 लाख 53 हजार 149 कार विकल्या. तर दुसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्सचा होता, ज्यांनी 35 हजार 299 वाहनांची विक्री केली. Hyundai तिसऱ्या क्रमांकावर आहे. ह्युंदाईने 32 हजार 312 मोटारींची विक्री केली. त्यापाठोपाठ होंडाने 7 हजार 973 कार विक्री केली.
डिसेंबर 2020 मधील या आकडेवारीची तुलना केल्यास, परिणाम थोडे आश्चर्यकारक आहेत. मारुतीने डिसेंबर 2020 मध्ये 1 लाख 60 हजार 226 वाहनांची विक्री केली. त्यानुसार कंपनीने 7 हजार 77 वाहनांची कमी विक्री केली. त्याच वेळी, डिसेंबर 2021 टाटांसाठी जबरदस्त होता. डिसेंबर 2020 मध्ये टाटा मोटर्सने 23 हजार 545 वाहनांची विक्री केली. म्हणजेच या डिसेंबरमध्ये कंपनीने 11 हजार 745 वाहनांची विक्री केली.
Hyundai बद्दल सांगायचे तर डिसेंबर 2021 हा कंपनीसाठी काही खास ठरला नाही. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीने 47 हजार 400 कार विकल्या होत्या. म्हणजेच, यानुसार डिसेंबर 2021 मध्ये कंपनी मागे राहिली होती. होंडा कार्स इंडिया लिमिटेडने डिसेंबर 2020 मध्ये 8 हजार 638 युनिट्सची विक्री केली. त्यानुसार डिसेंबर 2021 मध्ये कंपनी मागे पडली. Toyota बद्दल सांगायचे तर कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये 10 हजार 832 कार विकल्या, तर डिसेंबर 2020 मध्ये Toyota च्या 7 हजार 487 कार विकल्या गेल्या. त्यानुसार कंपनीने 45 टक्के अधिक कार विकल्या.