DC vs GT: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होत (DC vs GT) आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघाने आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. एनरिक नॉर्टजे संघात दाखल झाला आहे, तर २१ वर्षीय युवा यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल (Abhishek Porel) आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.
ऋषभ पंतच्या जागी अभिषेक पोरेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. पोरेल त्याच्या यष्टिरक्षण कौशल्याबद्दल खूप चर्चेत आहे. विशेष म्हणजे, कार अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत अजूनही बरा झालेला नाही त्यामुळे या हंगामात संघाचा भाग असणार नाही.
कोण आहे अभिषेक पोरेल?
अभिषेक पोरेल हा गेल्या वर्षीच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य आहे. गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने पदार्पण केले होते. 17 ऑक्टोबर 2002 रोजी जन्मलेल्या अभिषेक पोरेलने आतापर्यंत 16 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात 6 अर्धशतकांसह 695 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 3 लिस्ट ए सामन्यात अर्धशतकाच्या मदतीने 54 धावा केल्या. अभिषेक पोरेलने 3 टी-20 सामन्यात 22 धावा केल्या आहेत.
अभिषेक पोरेलचा रेकॉर्ड असा आहे
अभिषेक पोरेल फक्त २१ वर्षांचा आहे. मात्र, त्याने अद्याप फारसे क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. तरीही तो प्रभावित करण्यात यशस्वी ठरला आहे. टी-20 क्रिकेटबद्दलच बोलायचे झाले तर पोरेलने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 22 धावा केल्या आहेत. या तीन सामन्यांमध्ये तो 100 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय अंडर-19 संघाचा भाग होता.
प्रथम श्रेणी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर त्याने 16 सामन्यांमध्ये 695 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सहा अर्धशतके आहेत. यात त्याने आतापर्यंत 58 झेल आणि 8 स्टंपिंग केले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीला तो संघासोबत राहणार असून वरिष्ठ खेळाडूंकडून शिकणार आहे.
आयपीएल 2023 ची सुरुवात दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली झाली नाही. संघाला पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर वगळता संघाचे बाकीचे फलंदाज फ्लॉप झाले होते. वॉर्नरने अर्धशतकी खेळी खेळली होती.