Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Goat Farming Info : शेळीपालन व्यवसायाची आहे ‘ही’ परिस्थिती; वाचा गोट फार्मिंगची माहिती

शेळीपालन (Goat Farming) हा जगभरातील शेतकरी महिलांचा परंपरागत असा व्यवसाय (Business) आहे. महाराष्ट्रातही महिलांसह पुरुष शेळ्या वळण्याचा जोडधंदा करतात. आता त्याला आधुनिकीकरणाची जोड मिळण्यास सुरुवात झालेली आहे. अशावेळी अनेकांना या व्यवसायातील नफ्याचे आकडे खुणावत आहेत. ते काहीअंशी आभासी चित्र आहे. कारण, काहीजण या व्यवसायाद्वारे कोट्याधीश झालेले आहेत. मात्र, तो नियम नाही अपवाद आहे. त्यामुळेच आपली क्षमता, तोटा सहन करण्याची मानसिक तयारी आणि नफा मिळाल्यावर हुरळून न जाण्याचा गुण किती टक्के आहे, यावर आपल्याच मनात गणित करून या व्यवसायाच्या भानगडीत पडावे. (shelipalan Marathi information)

Advertisement

शेलीपालनात आहार व शेळ्यांचे आरोग्य याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. शक्यतो अशा पद्धतीचे लक्षपूर्वक शेती करण्याचे काम महिला करतात. त्यामुळे यामध्ये यशस्वी होण्याचे महिलांचे प्रमाण जास्त आहे. सध्या शेळीपालन म्हटले की ५०० ते १८०० रुपये किलोचे आकडे समोर येतात. माध्यमांनी बातम्यांतून अपवादात्मक परिस्थितीला या व्यवसायाचा नियम केल्याचे हे वास्तव आहे. यामध्ये ज्यांनी कोणी मोठे आकडे कमावलेले आहेत त्यांनी एकतर कोट्यवधी गुंतवणूक केलेली आहे. त्यातून कोट्यवधी आकडे येणे मग अपेक्षित आहे. किंवा काहीजणांनी आपले इतर व्यवसायाचे पैसे काळ्याचे गोरे करण्याचे यातून सध्या करताना असे भासवले आहे. यासह तिसरा आणि महत्वाचा मात्र, खऱ्या अर्थाने नफा कमावलेला घटक म्हणजे पैदाशीचे बोकड किंवा शेळ्या विकण्याचा धंदा करणारे. हे त्यातील शेळीपालक नसून बऱ्याचदा यातले मधले दलाल आहेत.

Advertisement

अशी परिस्थिती आहे म्हणजे शेळीपालन हा फ़क़्त तोटा देणारा धंदा आहे. असेच काहीही नाही. मात्र, आम्हाला इतकेच सांगायचे आहे की, हा माध्यमांच्या बातम्यांतून किंवा जाहिरातीतून फिरणाऱ्या आकड्यांनुसार बंपर नफा देणारा आणि जीवनात कायापालट घडवून आणणारा व्यवसाय आहे असे नाही. शेळीपालन हा एक किफायतशीर आणि जिद्दी व कष्ट घेण्याची तयारी असलेल्या महिलांसह तरुणांसाठी चांगला व्यवसाय आहे. कारण, शेळी किंवा बोकड हा जिवंत प्राणी आहे. त्याच्या आहार व आरोग्याची काळजी घेऊन आपण यामध्ये नफा कमवू शकतो. तसेच परदेशी शेळ्यांचे ठीक आहे मात्र, भारतातील गावठी शेळ्यांना दररोज पाय मोकळा करून आणावाच लागतो. किंवा तसे नसेल तर यासाठी शेतातील मोठी जागा कुंपण लावून तयार ठेवावी लागते.

Loading...
Advertisement

चारवू पद्धतीची जोड देऊन शेळीपालन केल्यास आहारावरील खर्च ३० ते ७० टक्के कमी होतो. तर, औषधोपचारावरील खर्चही ५० ते ६० टक्के कमी होतो. तसेच शेळ्या किंवा बोकड विविध औषधी वनस्पती खात असल्याने त्यांचा जाप्ता चांगला राहतो. अशा निरोगी शेळ्या व बोकड यांची वाढ जास्त वेगाने होते आणि व्यवसायाचे गणित नफ्याकडे जाते.

Advertisement

लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(क्रमशः) वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड (shelipalan Marathi information) आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement
Advertisement

Leave a Reply