Dairy Farmers Diwali Milk Bonus: अहमदनगर (ahmednagar): आपल्या स्वार्थापोटी अनेक राजकीय पुढारी मंडळींनी सहकारी दूध संस्थांची चळवळ मोडीत (political leaders destroyed the movement of cooperative milk societies) काढली. गावोगावी पसरलेल्या दूध सहकारी संस्था मग बंद पडल्या. मात्र, नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथे ही संस्था कार्यान्वित आहे. नव्हे ती नियमानुसार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी दुधाचा बोनस (milk bonus to farmers) देत आहे. यंदा या संस्थेने शेतकऱ्यांना लाखोंचा बोनस देऊन दिवाळी गोड केली आहे. (sweetened Diwali by giving a bonus of lakhs to the farmers)
- Diwali-Holi Celebration: म्हणून दिवाळीत केली होळी; म्हणून असे केले हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी
- Diwali festival :दिवाळीच्या मुहूर्तावर दाल कचोरीची रेसिपी करून पहा, ती कशी बनवायची ते जाणून घ्या
- Good News for Student: विद्यार्थ्यांना मिळणार ‘त्याचे’ही शिक्षण; पहा काय निर्णय घेतलाय विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी
आदर्श गाव हिवरे बाजार येथील मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेतर्फे (Mumbadevi Cooperative Milk Producers’ Association of Adarsh village Hivre Bazar) नुकतेच वार्षिक बोनस वाटप करण्यात आले. संस्थेला झालेल्या वार्षिक नफ्यातून सालाबादप्रमाणे यंदाही २ रुपये प्रतिलिटर प्रमाणे सभासदांना बोनस मिळाला. पद्मश्री पोपटराव पवार (कार्याध्यक्ष, आदर्शगाव गाव योजना, महाराष्ट्र राज्य / Padmashri Poptrao Pawar, Working President, Adarshgaon Village Scheme, Maharashtra State)), सौ. विमल दीपक ठाणगे (सरपंच हिवरे बाजार) , छबुराव ज्ञानदेव ठाणगे (चेअरमन, हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था), रामभाऊ कृष्णा चत्तर (व्हा. चेअरमन, हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था), बाबासाहेब गुंजाळ (व्हा. चेअरमन, मुंबादेवी सहकारी दुध संस्था), सखाराम पादीर, अर्जुन पवार, दामोधर ठाणगे यांच्या हस्ते बोनस वाटप करण्यात आले.
संस्थेचे सभासद रघुनाथ रंगनाथ बांगर यांना यंदा सर्वाधिक १,३१,२०६ रुपये बोनस मिळाला, तर रोहिदास हरिभाऊ ठणगे यांना १,१२,९६१; माधव रंगनाथ बांगर यांना १,००,१७१ रुपये इतका बोनस मिळाला. बाकी सर्व सभासदांना त्यांनी वर्षभर घातलेल्या दुधाच्या प्रमाणात बोनस मिळाला. संस्थेचे एकूण १३० सभासद असून यंदा रक्कम रुपये २०,९९,२२५ एकूण बोनस वाटण्यात आला. हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून २७० सभासदांना १४ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आले. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ८,८८,८५३/- नफा झाला असून त्या नफ्यातून वाटप करण्यात आले. (Hivre Bazar Various Executive Services Cooperative)