Dabur India (Mumbai) : देशातील सुप्रसिद्ध कंपनी डाबर इंडिया (Dabur India) आता मसाल्यांच्या व्यवसायात (Spices Business) उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीने बादशाह मसाला (Badshah Masala) या मसाल्यांच्या ब्रँडमध्ये (Brand) ५१ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. या करारानंतर आता बादशाह मसाला डाबर इंडियाकडे आहे. सप्टेंबर तिमाहीत डाबर इंडियाच्या नफ्यात घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीचे निकाल (Quarter reesult) जाहीर करण्यासोबतच कंपनीने बादशाह मसालामधील भागभांडवल (share capital) विकत घेण्याचीही घोषणा केली आहे.
- Reliance Jio : रिलायन्स जिओच्या या कंपनीचा नफा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
- Market News : रुपयाच्या तुलनेत कितीने झाली डॉलरची वाढ : वाचा सविस्तर
- Metaverse : “मेटावर्स’मध्ये प्रवेश करणारी ‘ही’ पहिली भारतीय कंपनी
- Banking News : बाबो… “त्या” बँकेच्या नफ्यात झाली ३७ टक्क्यांनी वाढ
डाबर इंडियाने बादशाह मसालामधील ५१ टक्के स्टेक ५८७.५२ कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात (Joint statement) म्हटले आहे की, बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील (Badshah masala private limited) ५१ टक्के भागभांडवल विकत घेण्यासाठी डाबरने (Dabur) निश्चित करार केला आहे. या करारानंतर बादशाह मसाला आता डाबर इंडियाच्या मालकीचा असेल. निवेदनानुसार, बादशाह मसाला सध्या ग्राउंड मसाले (Ground spices), मिश्रित मसाले (Mixed spices) आणि खाद्यपदार्थांचे उत्पादन (Food production), विक्री आणि निर्यात (Sells and exports) करते.
या डीलसाठी (Deal) बादशाह मसाल्याची किंमत ११५२ कोटी रुपये होती. उर्वरित ४९ टक्के भागभांडवल (Share capital) पाच वर्षांनी विकत घेतले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, डाबर इंडियाचा फूड बिझनेस (Food business) तीन वर्षांत ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार, डाबर इंडियाच्या (Dabur India) एकत्रित नफ्यात वर्ष-दर-वर्षाच्या (YoY) तुलनेत २.८५ टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा ४९०.८६ कोटी रुपये होता. त्याच वेळी, गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५०५.३१ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
आकडेवारीनुसार, कंपनीचा महसूल (Company revenue) सहा टक्क्यांनी वाढून २९८६ .४९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा २८१७ कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीच्या आकडेवारीनुसार डाबरच्या फूड्स अँड बेव्हरेजेस डिव्हिजनमध्ये (Foods and Beverages Division ) ३० टक्क्यांनी मजबूत वाढ झाली आहे. दुसरीकडे, फूड्स व्यवसायात (Food Business) २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.