Daal Recipes : डाळी हा आपल्या आहारातील प्रथिनांचा सर्वात महत्त्वाचा सुरू आहे. डाळ अनेक प्रकारे (Daal Recipes) तयार केली जाऊ शकते. जेणेकरून मुलांना देखील खायला आवडेल. आपण आपल्या आहारात विविध प्रकारे डाळींचा समावेश करू शकता. डाळी हा आपल्या आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. प्रत्येक घरात रोज डाळ तयार केली जाते. डाळी हा प्रथिानांचा उत्तम स्रोत मानला जातो.
मुगडाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ या प्रकारच्या डाळी आपण रोजच्या आहारात समाविष्ट करत असतो. याशिवाय सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी डाळींपासून बनवलेले खाद्यपदार्थ देखील खाल्ले जातात. काही मुलांना कडधान्य खायला आवडत नाही. त्यामुळे या पदार्थांच्या मदतीने तुम्ही त्यांच्या आहारात डाळींचा समावेश करू शकता.
Unhealthy Foods | सावधान..! ज्या पदार्थांना समजताय हेल्दी तेच पाडतील आजारी; वाचा अन् सावध व्हा
Daal Recipes
ढोकळा
ढोकळा हा एक गुजराती खाद्यपदार्थ आहे. परंतु देशभरात देखील लोकप्रिय आहे. ढोकळा डाळीपासून बनवला जातो म्हणून ढोकळा आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. ढोकळा हरभरा डाळीपासून तयार केला जातो. हा ढोकळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे नाश्त्यामध्ये तुम्ही ढोकळा या खाद्यपदार्थाचा समावेश नक्की करू शकता.
मूग डाळ चीला
मूग डाळ रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी बारीक करून घ्या. या डाळीच्या पेस्टमध्ये कांदा, मिरची, मीठ हे पदार्थ मिसळून गरम चिला तयार करा. हिरवी कोथिंबीर आणि पुदिना चटणी याबरोबर तुम्ही हा चीला खाऊ शकता.
Food Crisis | बाब्बो..! जगभरात तब्बल ‘इतक्या’ लोकांची होतेय उपासमार; ‘त्या’ अहवालाने केला खुलासा
Daal Recipes
मसूर डाळ डोसा
डोसा हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. परंतु देशभरात प्रसिद्ध आहे मसूर डाळ आणि तांदूळ मिक्स करून तुम्ही स्वादिष्ट डोसा तयार करू शकता. डोसा आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. त्यामुळे काही वेगळे आणि पौष्टिक खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही मसूर डाळ डोसा तयार करू शकता.
उडीद डाळ आप्पे
आप्पे हा दक्षिण भारतात तयार केला जाणारा स्वादिष्ट नाष्टा आहे. उडीद डाळीच्या आप्पेमध्ये ओट्स मिक्स करून याची चव आणखी वाढवता येऊ शकते.
मसूर डाळ पकोडे
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही मसूर डाळ पकोडे तयार करू शकता. हे पकोडे अत्यंत स्वादिष्ट असतात. यामध्ये तुम्ही आवडीच्या भाज्या टाकून ते अधिक आरोग्यदायी करू शकता.
मूग डाळ पकोडे
मूग साधारण सहा ते सात तास भिजत घालून नंतर बारीक करून घ्या. यामध्ये कांदा, मिरची, मीठ, हळद आणि हिंग टाकून गरमागरम मूग डाळ पकोडे तुम्ही तयार करू शकता.