DA Hike : बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.
असा मोजला जातो महागाई भत्ता
हे लक्षात घ्या महागाई भत्त्यात वाढ होण्यामागील तर्क स्पष्ट करताना, IBA ने सांगितले की मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीसाठी औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) (बेस 2016=100) पुढीलप्रमाणे आहे:
जानेवारी 2024 साठी: 138.9
फेब्रुवारी 2024 साठी: 139.2
मार्च 2024 साठी: 138.9
तसेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चसाठी सरासरी CPI 139 इतका आहे. हे गेल्यास तिमाहीच्या 123.03 च्या सरासरीपेक्षा जास्त असून यात 15.97 (139-123.03) गुणांचा फरक आहे. तर मागील तिमाहीतील सरासरी CPI 138.76 होता.
व्हॉईस ऑफ बँकिंगच्या संस्थापक अश्विनी राणा यांच्या मतानुसार महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाल्याची चर्चा पूर्णपणे दिशाभूल करणारी असून वाढ केवळ 0.24 टक्के आहे. मागील तिमाहीत, CPI मध्ये हा फरक 15.73 टक्के होता, जो आता 15.97 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे फरक 0.24 (15.97-15.73) टक्के आहे. डीए वाढ केवळ 0.24 टक्के असून आठवड्यातून ५ दिवस काम करण्यावरही चर्चा झाली
बँक कर्मचाऱ्यांची आठवड्यातून 5 दिवस काम करावे आणि दोन दिवस सुट्टी द्यावी, अशी मागणी आहे.जरी आयबीए आणि बँक कर्मचाऱ्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली असली तरी याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. सरकारकडून कोणतीही अधिसूचना आल्यानंतरच यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात येईल.
ग्रॅच्युइटीत झाली वाढ
मागील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीत वाढ झाली होती. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटीमध्ये 25 टक्क्यांनी वाढ केली होती. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे. 1 जानेवारी 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर त्यांचा डीए 50 टक्के झाला.