दिल्ली : गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसह अन्य काही राज्यांतील पोटनिवडणुकांची धामधूम सुरू असताना दक्षिण भारतातून टेन्शदायक बातमी येत आहे. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र खोल दाबाच्या पट्ट्यात वाढले असून ते गुरुवारी सायंकाळपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम उत्तर तामिळनाडू, पाँडेचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर राहील. येत्या 48 तासांत ते भयंकर रूप धारण करू शकते. तामिळनाडूच्या उत्तर किनारी जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्याचबरोबर वादळाचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.

राज्य सरकारने सखल भागांतून बाहेर काढलेल्या लोकांसाठी चक्रीवादळ प्रवण जिल्ह्यांमध्ये 5,000 हून अधिक मदत शिबिरे उघडली आहेत. शिबिरात राहणाऱ्या लोकांना अन्न, पिण्याचे पाणी, आरोग्य यासह सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पावसाच्या परिणामावर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्षही उघडण्यात आला असून, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस आणि त्याचा परिणाम यावर लक्ष ठेवणार आहे. याबाबत हिंदी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. या संकटाचा फटका कमीत कमी बसावा यासाठी ही तयारी केली जात आहे. केंद्र सरकारही येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. राज्य सरकारला मदत करण्याचीही तयारी आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version