Cvoter Exit Poll 2024 : राज्यात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मविआला अच्छे दिन

Cvoter Exit Poll 2024 : येत्या 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागले आहे. अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाची जादू चालेल? याबाबत एबीपी सी-व्होटर एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहेत.

व्होट शेअरबद्दल बोलायचे झाल्यास इंडिया आघाडीला 44 टक्के, एनडीएला 45 टक्के तसेच 11 टक्के मते इतरांच्या खात्यात जात आहेत. लोकसभेसाठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 8 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 11 जागांवर मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात 20 जागांसाठी 13 जागांवर मे रोजी मतदान पार पडले होते.

महाराष्ट्रात ‘या’ जागांवर असणार सर्वांची नजर

महाराष्ट्रात नागपूर, बारामती, उस्मानाबाद, अमरावती, नांदेड, सातारा, चंद्रपूर, अकोला, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, नाशिक, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या जागांवर असणार सर्वांची नजर आहे.

या उमेदवारांवरही असणार सर्वांच्या नजरा

लोकसभेमध्ये पियुष गोयल, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड,अजित पवार, सुप्रिया सुळे, राजन बाबुराव विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, दानवे रावसाहेब दादाराव, पंकजा मुंडे, सुजय विखे-पाटील, नितीन गडकरी, अनूप धोत्रे, उदयनराजे भोसले, सुनील पवार, अरविंद सावंत या उमेदवारांवरही लक्ष असणार आहे.

कोणाला किती जागा मिळणार?

महायुतीमध्ये भाजपला 17 शिंदे गटाला 06 आणि अजित पवार गटाला 01 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला 09 काँग्रेसला 08 आणि शरद पवार गटाला 06 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोल ने दिला आहे.

Leave a Comment