Cvoter Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आज सातवे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर राजकीय पक्षांची धाकधूक वाढली असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी अनेक एक्झिट पोल समोर येताना दिसत आहे.
यापैकी एक असणाऱ्या ABP-CVoter ने देखील लोकसभेसाठी एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले आहे. ABP-CVoter ने जाहीर केलेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
या एक्झिट पोल नुसार राज्यात महाविकास आघाडीला 23 ते 25 आणि महायुतीला 22 ते 26 मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुतीमध्ये भाजपला 17 शिंदे गटाला 06 आणि अजित पवार गटाला 01 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला 09 काँग्रेसला 08 आणि शरद पवार गटाला 06 जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलने दिला आहे.