Cultivation of garlic । शेतकऱ्यांनो, लसणाच्या लागवडीतून मिळेल भरघोस नफा; त्यासाठी करा ‘हे’ महत्त्वाचे काम

Cultivation of garlic । सध्या लसूण शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. लसणाच्या शेतीतून जास्त नफा मिळत आहे. लसूण लागवड करताना काही शेतकरी एकेरी शेती पद्धतीचा अवलंब करत असल्याने त्यांना या शेतीतून अधिक नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लसूण लागवड करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेणेकरून तुम्हाला जास्त नफा मिळेल.

लसणाचा मोठ्या प्रमाणात वापर घरे, रेस्टॉरंट्स आणि फूड इंडस्ट्रीजमध्ये करण्यात येतो. लसणाची लोकप्रियता आणि आरोग्यविषयक जागरूकतेमुळे लसणाची मागणी सतत वाढत चालली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, इतर पिकांच्या तुलनेत लसूण लागवडीसाठी कमी खर्च येतो. इतकेच नाही तर बियाणे, सिंचन आणि खतांची गरज कमी असते.

शेतकरी बांधवांनो, लसणाचे उत्पादन हेक्टरी १०-१५ टनांपर्यंत असते. तुम्ही आता लसणाची योग्य काळजी घेऊन आणि प्रगत तंत्राचा वापर करून आपले उत्पादन आणि नफा वाढवू शकतात. लसूण बाजारात चांगल्या दरात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला याचा फायदा होईल

चांगल्या प्रतीचे बियाणे

हे लक्षात घ्या की लसणाला चिकणमाती माती लागते. ज्यामध्ये ड्रेनेजची चांगली व्यवस्था आहे. शेतकरी बांधवांनी रोग व किडीपासून मुक्त असणारे चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. तज्ज्ञांच्या मतानुसार लसणाची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करण्यात येते. लसणासाठी आवश्यकतेनुसार खत व पाणी द्यावे.

कीड टाळण्यासाठी उपाययोजना

लसणाला अनेक रोग आणि कीटकांचा धोका असल्याने बचाव करण्यासाठी योग्य उपाययोजना करा. लसणाची पाने पिवळी झाली की त्यांची कापणी करा. काढणीनंतर, लसूण थंड आणि कोरड्या जागी ठेवा.

Leave a Comment