Petrol Price : इंधनाच्या वाढत्या महागाईने हैराण झालेल्या भारतीयांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे देशात इंधनाचे दर कमी होतील असे संकेत मिळत आहेत. बुधवारी क्रूड ऑईलच्या किंमती सहा महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर पोहोचल्या होत्या.
Vodafone Idea : खिशाला लवकरच बसणार झटका.. 5G नेटवर्कबाबत घेणार ‘हा’ निर्णय.. https://t.co/9eB4PIqb0J
— Krushirang (@krushirang) August 5, 2022
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये जवळपास 4 टक्क्यांची घट झाली आहे. ब्रेंट क्रुड ऑईल LCOc1 फ्यूचर्स 3.76 डॉलर म्हणजेच 3.7 टक्के घसरणीसह 96.78 बॅरलवर आले. 21 फेब्रुवारीनंतरची ही सर्वात कमी किंमत आहे. देश कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. भारताला गरजेच्या 85 टक्के इंधन बाहेरून विकत घ्यावे लागते, ज्याच्या बदल्यात डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात, त्यामुळे कच्चे तेलाच्या किंमती वाढल्या आणि डॉलर (Dollar) मजबूत झाला तर देशात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतात. तज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाचे भाव एक डॉलरने वाढले तर देशात पेट्रोल-डिझेलचे दर 50-60 पैसे वाढतात.
PNG Price : महागाईच्या दिवसात आम आदमीला आणखी एक झटका; ‘या’ इंधनाच्या दरात मोठी वाढ.. https://t.co/jwcWEZ3wjO
— Krushirang (@krushirang) August 5, 2022
तज्ज्ञांच्या मते मागील तीन महिन्यांच्या काळात कच्च्या तेलाची किंमत 18 टक्के कमी झाली आहे. मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईलने (Crude Oil) 139 डॉलर प्रति बॅरल हा विक्रम गाठला होता. आता या तेलाच्या दरात झालेली घट जास्त प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांना दिलासा देणारी ठरणार आहे. यामुळे देशांतर्गत इंधनाचे भाव कमी करण्यास मदत होणार आहे. भारतातही पेट्रोल डिझेलचे दर आणखी 3 ते 5 रुपयांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तसे पाहिले तर ही फक्त शक्यता आहे. सरकार काय निर्णय घेते यावर सारे काही अवलंबून राहणार आहे. कारण याआधी कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या तेव्हाही सरकारने इंधनाचे दर कमी केले नव्हते. त्यामुळे यंदा अशी परिस्थिती असली तरी सरकारी पातळीवर काय निर्णय घेतला जातो याबाबत आताच काहीही सांगता येणे कठीण आहे.