Crop Insurance : केंद्र सरकारने (Central Government) खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhanmantri Crop Insurance Scheme) जाहीर केली आहे. या योजनेत आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) 2 लाख 20 हजार 976 शेतकरी (Farmer) सहभागी झाले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत होती. या मुदतीत दोन लाखांपेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या मात्र कमीच आहे. शेतकरी नोंदणी 1 ऑगस्ट या दिवशीही नोंदणी सुरू होती. नोंदणीसाठी एक दिवस वाढीव मुदत मिळाली होती. त्यानंतर मात्र मुदतवाढ मिळाली नाही. जिल्ह्यात अनेक शेतकरी या योजनेत सहभागी नाहीत.
सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. नगर जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो (HDFC Ergo) कंपनी नियुक्त केली आहे. या योजनेबाबत शेतकर्यांच्या अडचणी, तक्रारी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीने प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नेमले आहेत. या प्रतिनिधींकडून शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत होती. या मुदतीत जवळपास 2 लाख 20 हजार शेतकर्यांनी अर्ज (Application) केले आहेत. बर्याच शेतकर्यांनी नोंदणी केली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता या योजनेस आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. प्रत्यक्षात मात्र मुदतवाढ मिळाली नाही.
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस (Rain) झाला आहे. पाण्याची (Water) कोणतीही काळजी राहिलेली नाही. त्यामुळे पिकांचा विमा (Crop Insurance) घेण्याकडे शेतकर्यांनी यंदा फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे विमा योजनेत सहभागी शेतकर्यांचा संख्या मागील वर्षाच्या तुलनेत कमीच राहिला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या काळात शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळणे जास्त महत्वाचे ठरते. याआधी मागील वर्षात नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या जवळपास 45 हजार शेतकर्यांना 26 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. पीक काढणीस येण्याच्या साधारण पंधरा दिवस अगोदर नुकसानीच्या घटना घडतात. अशा वेळी पीक विमा घेतला असेल तर या नुकसानीची भरपाई मिळते.