Criminal Laws : मोठी बातमी! आजपासून लागू झाले तीन नवीन फौजदारी कायदे, सर्वसामान्यांवर होणार असा परिणाम

Criminal Laws : आजपासून म्हणजेच, जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक बदल करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल. अशातच आजपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. भारतीय न्यायिक संहिता 1860 मध्ये केलेल्या IPC ची जागा घेणार असून भारतीय नागरी संरक्षण संहिता 1898 मध्ये बनवलेल्या CrPC ची जागा घेईल तर 1872 चा इंडियन एविडंन्स अॅक्टची जागा भारतीय साक्ष्य अधिनियम घेणार आहे.

हे तीन नवे कायदे लागू झाल्यानंतर अनेक नियम आणि कायद्यांमध्ये बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. यात अनेक नवीन विभागांचा समावेश केला आहे. नवीन कायदे लागू झाल्यानंतर सामान्य माणूस, पोलीस, वकील आणि न्यायालय यांच्या कार्यपद्धतीत बदल होईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे CRPC मध्ये एकूण 484 कलमं असताना, भारतीय नागरी सुरक्षा संहितेत (BNSS) 531 कलमं होती. यात ऑडिओ-व्हिडीओ म्हणजेच, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गोळा केलेल्या पुराव्यांना महत्त्व दिले आहे. कोणत्याही गुन्ह्यात कारागृहात जास्तीत जास्त शिक्षा भोगलेल्या कैद्यांना खासगी जातमुचलक्यावर सोडण्याची तरतूद नवीन कायद्यात केली आहे.

एफआयआर झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत कोर्टाला आरोपपत्र दाखल केल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित करावे लागणार आहेत. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निकाल द्यावा लागेल. निकाल दिल्यानंतर त्याची प्रत 7 दिवसांत द्यावी लागणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना लेखी कळवावं लागणार आहे. माहिती ऑफलाईन तसेच ऑनलाईन द्यावी लागणारआहे . तसेच 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये, पीडितेला पोलीस ठाण्यात महिला हवालदार असेल तर पीडितेचं म्हणणं नोंदवून कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे.

Leave a Comment