Crime News । खळबळजनक! भाजप पदाधिकाऱ्याने केला ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला

Crime News । मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हे वाढत चालले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलीस प्रशासनासमोरचे मोठे आव्हान बनले आहे. दररोज घडत असणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत चालले आहे.

अशातच नांदेडमधील राजकीय वर्तुळातून धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्याने हिमायतनगरचे ठाकरे गटाच्या माजी नगरध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या जीवघेण्यात कुणाल राठोड गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नांदेडच्या हिमायतनगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर जीवघेणा चाकूने हल्ला केला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राम सूर्यवंशी आणि कुणाल राठोड यांच्यात राजकीय वाद सुरु होता.

मंगळवारी रात्री भाजपचे सूर्यवंशी आणि राठोड यांच्या पुन्हा वाद झाला. या वादात रागाच्या भरात राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोड यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला. जीवघेण्या हल्ल्यांनंतर राठोड यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या राठोड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Comment