मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियामध्ये सर्व काही ठीक दिसत नाही. T20 विश्वकप स्पर्धेच्या अगदी आधी, विराट कोहलीने घोषित केले की T20 कर्णधार म्हणून ही त्याची शेवटची स्पर्धा असेल आणि त्यानंतर तो एकदिवसीय आणि कसोटी संघांचे नेतृत्व करत राहील. इथपर्यंत सर्व काही ठीक होते, पण त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि विराट कोहली यांच्यात कर्णधारपदाबाबत जो वाद सुरू झाला तो पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले. या वादावर आता माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या दोघांनाही चांगलेच फटकारले आहे. या दोघांनाही हा वाद मिटवून देशाला प्रथम प्राधन्य द्यावे असे सांगितले आहे.
द वीक मॅगझिननुसार, कपिल देव म्हणाले, की ‘या दोघांनी आपापसात हे प्रकरण सोडवायला हवे होते. सर्वात आधी देशाला प्राधान्य द्या, मला जे हवं होतं ते मिळालं, पण कधी कधी मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कर्णधारपद सोडाल. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघास एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही म्हणून त्याने कर्णधारपद सोडले तर मला काय सांगावे ते कळत नाही.
खरे तर, विराटने स्वतः टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले, त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माकडे वनडे संघाची कमानही सोपवण्यात आली. याबद्दल बीसीसीआयकडून विधान आले की विराटला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु त्याने तसे केले नाही आणि निवडकर्ते मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये दोन भिन्न कर्णधारांच्या बाजूने नव्हते. त्यामुळे रोहितकडे वनडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. याशिवाय विराटला याची माहिती देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यानंतर, जेव्हा विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी सांगितले की टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नका असे त्याला कोणीही सांगितले नाही, तेव्हा वाद सुरू झाला.
याशिवाय घोषणेच्या काही वेळाआधीच त्याला वनडे कर्णधारपदाची माहिती देण्यात आली होती. इथून बीसीसीआय आणि विराट यांच्यातील मतभेदाचे चित्र स्पष्ट होऊ लागले. दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय संघाची घोषणा केल्यानंतर निवडकर्त्यांनी बीसीसीआयला होकार देत पुन्हा त्याच गोष्टी सांगितल्या. कसोटी मालिका संपताच विराटने कसोटी कर्णधारपदही सोडले.
.. आणि तरीही राहुलने केलेय ‘हे’ शानदार रेकॉर्ड; विराटलाही टाकलेय मागे; जाणून घ्या, डिटेल