Cricket News : टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला (Australia) 2-1 ने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. 2022 च्या टी 20 विश्वचषकाआधी ही क्रिकेट मालिका होणार आहे. टीम इंडियाला 28 सप्टेंबरला तिरुअनंतपुरममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 खेळायचा आहे. मालिकेतील इतर दोन सामने अनुक्रमे 2 आणि 4 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी आणि इंदूर येथे होतील. या दौऱ्यावर दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. परंतु विश्वचषक संघाचे प्रमुख खेळाडू या मालिकेचा भाग नसल्याच्या बातम्या आहेत. भारत 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध T20 विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. त्यापूर्वी संघ दोन सराव सामने (Cricket) देखील खेळणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20 – 28 सप्टेंबर, तिरुअनंतपुरम , दुसरा T20 – 2 ऑक्टोबर, गुवाहाटी, तिसरा T20 – 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच पहिली एकदिवसीय सामना – 6 ऑक्टोबर, लखनऊ, दुसरा एकदिवसीय सामना – 9 ऑक्टोबर, रांची येथे तर तिसरा एकदिवसीय सामना – 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत ज्यात भारताने 11 सामने जिंकून वर्चस्व राखले आहे, तर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेने 8 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला ज्याचा निकाल लागला नाही. पण या संघाविरुद्ध मायदेशात भारताचा (India) रेकॉर्ड चांगला नव्हता. भारतामध्ये या दोन संघांमध्ये झालेल्या 9 सामन्यांपैकी टीम इंडियाने केवळ 3 सामने जिंकले आहेत, तर पाहुण्या संघाने 5 सामने जिंकले आहेत. शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेने जून 2022 मध्ये भारताचा दौरा केला होता, जेव्हा 5 सामन्यांची T20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती.