CRICKET LIVE : मुंबई : भारताच स्टार फलंदाज (Star Batsman )विराट कोहली सध्या आपल्या खराब फॉर्ममुळे अडचणीत सापडला असून गेल्या अडीच वर्षांत त्याने एकही शतक (Century) ठोकलेले नाही. त्याच्या या खराब फॉर्ममुळे भारताच्या माजी क्रिकेटपटुंन त्याला विश्रांती घेण्याचा तर स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. हे सर्व सुरु असताना आता भारताचा माजी कर्णधार तथा बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यानेही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
गांगुली म्हणाला की, सध्या कोहली त्याच्या आयुष्यातील कठीण काळास सामोरे जात आहे. मात्र त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आकडे बघा… तो एक महान खेळाडू असून तो लवकरच फॉर्ममध्ये येईल आणि चांगली फलंदाजी करेल, अशी आशा व्यक्त केली. सध्या भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सुरु (INDIA TOUR ON ENGLAND) असून यामध्ये कोहली आतापर्यंत अपयशी ठरला आहे. कसोटी आणि टी-20 मालिकेतील दोन्ही डावात कोहली चांगली कामगिरी करु शकलेला नाही. भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी विराट कोहलीला (VIRAT KOHLI) आता संघातून वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे तर कपिल देव (KAPIL DEV )यांनी देखील विराटला बेंचवर बसवून नव्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना संधी द्यावी असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, आज इंग्लंडविरूद्धचा दुसरा सामना लॉर्डस मैदानावर होणार असून या सामन्यात कोहलीला संधी न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोहलीच्या मांडीचा स्नायू दुखावल्याने तो संघाबाहेर राहू शकतो. भारताने पहिल्या सामन्यात 10 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. ही आघाडी कायम ठेवण्याचा आज टीम इंडियाचा प्रयत्न असेल.