IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही क्रिकेटपटूंसाठी नेहमीच सुवर्णसंधी राहिली आहे. ही एक लीग आहे जिथे खेळाडू आपली प्रतिभा सिद्ध करतात. दुसरे म्हणजे आयपीएल लिलावात खेळाडूंवर लावलेली बोलीही त्यांना रातोरात श्रीमंत बनवते. असेच टीम इंडियाच्या 8 स्टार खेळाडूंचे नशीब चमकले आहे. असे काही खेळाडू आहेत जे आयपीएलच्या माध्यमातून करोडपती बनले आहेत.
KL Rahul
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) या खेळाडूंच्या यादीत पहिले नाव आहे ज्याने आयपीएलद्वारे ठसा उमटवला आणि श्रीमंत झाला. केएल राहुलला प्रथम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. त्यानंतर शानदार कामगिरीनंतर त्याची किंमत वाढली. आता तो लखनऊचा कर्णधार आहे आणि त्याला 17 कोटी रुपये मिळत आहेत.
Ravindra Jadeja
या यादीत चेन्नईचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही (Ravindra Jadeja) समावेश आहे. जडेजाची तिन्ही फॉरमॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी उत्कृष्ट आहे. 2008 मध्ये राजस्थान संघाने त्याला 2008 मध्ये अवघ्या 10 लाखात खरेदी केले. मात्र आता त्यांची किंमत गगनाला भिडली आहे. तो 16 कोटींमध्ये चेन्नई संघाचा भाग आहे.
Ishan Kishan
टीम इंडियासाठी द्विशतक झळकावणारा युवा इशान किशन (Ishan Kishan) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला 2016 मध्ये गुजरात लायन्सने 35 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र युवा फलंदाजाने आपल्या कामगिरीने आपल्या किमतीत मोठी वाढ केली. आता या खेळाडूला मुंबईसाठी 15.2 कोटी रुपये मिळतात.
Hardik Pandya
यानंतर गुजरात टायटन्सला आयपीएल ट्रॉफी मिळवून देणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) येतो. 2015 मध्ये त्याची किंमत फक्त 10 लाख रुपये होती. परंतु त्यांनी दरवर्षी अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याची किंमत आता गगनाला भिडली आहे. हार्दिकला गुजरातमधून 15 कोटी रुपये मिळतात. एवढेच नाही तर या संघाला ट्रॉफी मिळाल्यानंतर त्याचे टीम इंडियातील पदही वाढले आहे. त्याने टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही संघाचे नेतृत्व केले आहे.
Sanju Samson
यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आहे. त्याने आयपीएलमधील आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. ज्याची किंमत फ्रँचायझी त्यांना देते. मात्र तो टीम इंडियात आपले स्थान नियमितपणे प्रस्थापित करू शकलेला नाही. सॅमसनला 2012 मध्ये 8 लाख रुपये मिळाले होते. आता त्याची किंमत 14 कोटी रुपये आहे.
Suryakumar Yadav
आता T20 चा बादशाह सूर्यकुमार यादवबद्दल बोलू या. मिस्टर 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमारला त्याच्या पहिल्या सीझनमध्ये 10 लाख रुपये मिळाले. पण आता मुंबई इंडियन्समध्ये त्याची फी आठ कोटी रुपये केलीआहे. आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन तो या पदावर पोहोचला आहे.
सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी टी-20 मध्ये 3 शतकी खेळी खेळली आहे. त्याने आपल्या असामान्य फटकेबाजीने सर्वांना वेड लावले आहे. मात्र, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीची छाप सोडण्यात त्याला फार काही यश मिळालेले नाही.