IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) 2023 च्या हंगामापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा लिलाव या वर्षी डिसेंबरच्या मध्यात आयोजित करण्याची योजना आखत आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल लिलावाची तारीख 16 डिसेंबर असण्याची शक्यता आहे. त्यात असेही म्हटले आहे, की 2023 च्या आयपीएल हंगामाच्या संभाव्य वेळापत्रकावर फ्रँचायझींमध्ये चर्चा करण्यात आली आहे. ज्यांना बीसीसीआय आणि आयपीएलमधील अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चेद्वारे माहिती देण्यात आली आहे.
अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ‘साहजिकच, हा एक मिनी-लिलाव असेल, परंतु ठिकाण अद्याप ठरलेले नाही. तसेच लीगच्या तारखाही ठरलेल्या नाहीत. खेळाडूंच्या लिलावासाठी सर्व संघांकडे 95 कोटी रुपये असतील, जे गेल्या वर्षीच्या लिलावापेक्षा ५ कोटीने जास्त आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी अलीकडेच राज्य युनिट्सना लिहिले की आयपीएल 2023 सामान्य स्थितीत परत येईल, जे कोविड -19 (Covid 19) साथीच्या आजारामुळे गेल्या तीन हंगामात झाले नाही.
2020 मध्ये कोरोनाच्या (Corona) उद्रेकामुळे काही ठिकाणी आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. 2020 मध्ये युएईतील तीन ठिकाणी रिकाम्या स्टेडियममध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. 2021 मध्ये ही T20 स्पर्धा दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई या चार ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पण आता महामारी नियंत्रणात आली आहे आणि त्यामुळे ही लीग जुन्या फॉरमॅटमध्ये होईल. याबाबत अद्याप नियोजन सुरू असून कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. त्यानंतर याबाबत माहिती दिली जाणार आहे.