मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर आता 6 फेब्रुवारी पासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट मालिकेस सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अतिशय निराशाजनक कामगिरी केल्यानंतर संघात काही महत्वाचे बदल होणार हे निश्चित आहे. काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. आता संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेण्याआधीच एक महत्वाची बातमी मिळाली आहे. भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज आर. अश्विन वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून माघार घेणार असल्याची माहिती आहे. क्रिकबझने याबाबत वृत्त दिले आहे.
अश्विनचे तब्बल 4 वर्षांनी लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. पण आगामी काळात त्याच्यावर उपचार होणार असल्याने तो मालिकेसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती आहे. तसेही अश्विनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अतिशय खराब कामगिरी केली होती. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्याच्या या कामगिरीवर जोरदार टीका केली होती आणि अश्विनऐवजी अन्य चांगल्या खेळाडूला संधी द्यावी, असे म्हटले होते. त्यानंतर निवड समितीही आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अश्विनचा विचार करणार नाही, अशीही चर्चा सुरू होती. त्यात आता अश्विन या मालिकेसाठी उपलब्ध राहणार नसल्याचे समजते आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची निवड 25 जानेवारीलाच होणार होती. मात्र, निवड समितीची बैठक दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी काळात होणारा टी 20 विश्वकप आणि एकदिवसीय विश्वकपसाठी टीम इंडियाच्या नियोजनात अश्विनचा प्रामुख्याने विचार होणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा अश्विनच्या समावेशासाठी खास आग्रही आहे. या दोन महत्त्वांच्या स्पर्धांसाठी अश्विन फिट राहावा म्हणून त्यास वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा वेस्ट इंडिज दौऱ्याला झटका; फक्त ‘या’ दोन शहरांतच होणार सामने; BCCI निर्णय घेण्याच्या तयारीत