Cricket Australia Calls Off with Afghanistan : क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा (Cricket Australia Calls Off with Afghanistan) एकदा अफगाणिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये दोन्ही देशांदरम्यान टी 20 मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे (AUS vs AFG) यजमानपद अफगाणिस्तानकडे होते. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिकाच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीचेच (Taliban) कारण यासाठी देण्यात आले आहे. कारण, अफगाणिस्तानात अजूनही महिला खेळाडूंना क्रिकेट खेळण्यास परवानगी नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाने नकार (Australia) देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वेळेस ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास (ICC) नकार दिला होता.
World’s most Happy Country : जगात सर्वात आनंदी देश कोणता? अमेरिका नाही, ‘हा’ देश सर्वात हॅपी!
Cricket Australia
तसं पाहिलं तर अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून महिलांचे अधिकार कमी करण्यात आले आहेत. तालिबान्यांनी महिलांना क्रिकेट खेळण्यासही मनाई केली आहे. तालिबान सरकारच्या या निर्णयाचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जोरदार विरोधही केला होता. महिलांना क्रिकेट खेळण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले आहे की क्रिकेटमध्ये महिलांच्या योगदानास प्रोत्साहन देण्याचे काम क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नेहमीच केले आहे. हेच धोरण आम्ही भविष्यातही कायम ठेवणार आहोत. यासाठी आम्ही आयसीसी आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांना सोबत घेऊन काम करू. आगामी काळात द्विपक्षीय मालिका कशा भरवल्या जातील यादृष्टीनेही प्रयत्न करणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या निवेदनात म्हटले आहे.
Cricket Australia
Indian Cricket : क्रिकेट सोडलं, पॉलिटिक्स सुरू केलं; राजकारणात ‘या’ खेळाडूंचं नशीब चमकलं
टी 20 विश्वचषकात राखीव दिवस
आयसीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दुसऱ्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या संघाने कमीतकमी पाच ओव्हर टाकण्याची आवश्यकता असेल. पाच ओव्हर होण्याआधीच जर पाऊस आला तर हा सामना पूर्ण झाल्याचे मानले जाणार नाही.