Credit Score Details : क्रेडिट स्कोर खराब झालाय? मग, सुधारण्यासाठी ‘इतके’ वर्ष थांबा; अहवालात खुलासा

Credit Score Details : आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी कर्जाची (Credit Score Details) गरज भासतेच. नोकरदार व्यक्ती असो किंवा मोठा उद्योगपती. काही प्रसंगी कर्ज घ्यावेच (Loan) लागते. कर्ज बँका, पतसंस्था किंवा खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून दिले जाते. कर्ज देताना मात्र आधी तुमचा क्रेडिट स्कोर (Credit Score) तपासला जातो. तुमचा स्कोर जर 700 ते 900 च्या दरम्यान असेल तर तुम्हाला अगदी सहज कर्ज मिळेल. परंतु, हाच क्रेडिट स्कोर कमी झाला तर सहजासहजी कर्ज मिळत नाही. खराब झालेला क्रेडिट स्कोर लवकर सुधारलाही जात नाही. तेव्हा जर तु्म्ही कर्ज घेतलेले असेल तर त्या कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरले जातील याकडे लक्ष ठेवा.

क्रेडिट स्कोर म्हणजे काय ?

क्रेडिट स्कोर हा संबंधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतो. तुमचा स्कोर 700 पेक्षा जास्त असेल तर तो चांगला मानला जातो. क्रेडिट कार्डचे बिल असेल किंवा कर्जाचा हप्ता (Loan Installment) तुम्ही जर वेळेत भरला नाही तर क्रेडिट स्कोर (CIBIL Credit Score) खराब होतो.

Credit Score : क्रेडिट स्कोअरबाबत ‘ही’ माहिती जाणून घ्याच, होईल बंपर फायदा 

Credit Score Details

क्रेडिट स्कोर अनेक घटकांवर अवलंबून असतो. कर्जाचे हप्ते थकले, क्रेडिट कार्डची लिमिट पूर्ण वापरले तरी क्रेडिट स्कोर कमा होतो. तथापि या गुणांमध्ये सुधारणा झाली तर क्रेडिट स्कोरही सुधातो. परंतु, क्रेडिट स्कोर एकदा कमी झाला तर लवकर सुधारला जात नाही.

लाइव्हमिंटच्या (Livemint) अहवालानुसार, सिबील क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी किमान सात वर्षे लागू शकतात. तुम्ही जर वेळेवर पैसे भरले नाहीत तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर सात वर्षांपर्यंत दिसतो. जर एखाद्या कर्जाचे बँकेत सेटलमेंट केले गेले असेल तरीही त्याची माहिती क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसू शकते. त्यामुळे या गोष्टींची माहिती लक्षात असू द्या.

Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? मग लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Leave a Comment