Credit Score Benefits : चांगल्या क्रेडिट स्कोअरचे 5 फायदे; माहिती घ्या अन् फायद्यात राहा !

Credit Score Benefits : आजच्या डिजिटल बँकिंगच्या युगात बँक तुमच्या प्रत्येक आर्थिक (Credit Score Benefits) घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. अनेकदा सिबील स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक (Credit Score) चांगला मानला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर या मर्यादित (Cibil Score) असेल तर तुम्हाला बँकेकडून कोणत्याही अडचणींशिवाय कर्ज मंजूर होऊ शकते. यासोबतच तुम्ही बँकेच्या दृष्टीने विश्वासू ग्राहक राहता. सिबिल स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला या स्कोअरचे काही फायदे सांगणार आहोत.

कर्ज मंजुरी

जर तुमचा क्रेडिट स्कोर (Credit Score) चांगला असेल तर बँकेकडून कर्ज घेताना त्याचा (Bank Loan) सर्वात मोठा फायदा तुम्हाला होतो. चांगल्या सिबिल स्कोअरसह तुम्हाला बँकेचे कर्ज लवकर मंजूर होते. याशिवाय तुम्ही क्रेडिट कार्डसाठी (Credit Card) अर्ज केल्यास बँक त्यावर ताबडतोब कार्यवाही करते. अशा पद्धतीने तुम्हाला चांगल्या सिबिल स्कोअरचा फायदा कर्जाची मंजुरी लवकर मिळण्यात होतो.

Credit Score Benefits

कमी व्याज

चांगल्या सिबिल स्कोअरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी व्याज. सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला बँकेकडून कमी व्याजदरावर कर्ज मिळू शकते. यासोबतच तुम्ही व्याजदर कमी करण्यासही बँकेला सांगू शकता. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर बँक नक्कीच तुमच्या विनंतीचा विचार करू शकते.

Credit Card Use : क्रेडिट स्कोअर कमी झाल्याने काळजीत आहात? ‘या’ 5 गोष्टींचा आधी विचार करा

अधिक क्रेडिट मर्यादा

जर तुमचा क्रेडिट स्कोर बराच काळ चांगला राहिला तर त्याचा परिणाम तुम्हाला जाणवतो. या गोष्टीचा फायदा क्रेडिट मर्यादित मिळेल. अनेक वेळा चांगले क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना बँका नेहमीपेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा देतात असे अनेक वेळा दिसून आले आहे.

Credit Score Benefits

ऑफर्स

जर तुमचा सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही बँकांकडून विशेष ऑफर देखील घेऊ शकता. ज्या कमी क्रेडिट स्कोर असलेल्या लोकांसाठी बहुदा उपलब्ध नसतात. अनेक वेळा बँका चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना प्रीमियम कार्ड ऑफर करत असतात. यामध्ये त्यांना अनेक विशेष पॉईंट्सचे फायदे देखील मिळतात. चांगला क्रेडिट स्कोअर असण्याचा हा एक फायदा असतो. बँकेच्या दृष्टीने अशा लोकांसाठी नेहमीच चांगल्या ऑफर्स तयार केल्या जातात त्यामुळे चांगला क्रेडिट स्कोअर ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा.

Credit Score : क्रेडिट स्कोअरबाबत ‘ही’ माहिती जाणून घ्याच, होईल बंपर फायदा 

Credit Score Benefits

विमा प्रीमियम

आजच्या काळात विम्याचा हप्ता निश्चित करण्यात (Insurance Premium) क्रेडिट स्कोअर देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. चांगला क्रेडिट स्कोअर असल्याने तुम्हाला कमी प्रीमियमवर कंपन्यांकडून विमा मिळण्यात अडचणी येणार नाहीत. या काळात तुम्हाला निश्चितच मदत होऊ शकते याद्वारे तुम्ही दरवर्षी विमा प्रीमियम मध्ये मोठी बचत करू शकता.

Leave a Comment