Credit Card Use : क्रेडिट स्कोअर कमी झाल्याने काळजीत आहात? ‘या’ 5 गोष्टींचा आधी विचार करा

Credit Card Use : क्रेडिट कार्ड आपल्यासाठी खूप उपयुक्त (Credit Card Use) ठरू शकते जर ते योग्य पद्धतीने वापरले गेले तर.. पगार संपल्यानंतर महत्त्वाची बिले भरणे पण अनेक वेळा आपण क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर अत्यंत निष्काळजीपणे करतो यामुळे क्रेडिट स्कोर खराब (Credit Score) होण्याचा धोका उद्भवतो. क्रेडिट कार्डद्वारे क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा याबाबत आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

कर्ज घ्यावं लागतं तेव्हा अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कर्ज घेण्यापूर्वी बँक सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर चेक करते. क्रेडिट स्कोर खराब असल्यास कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आपला क्रेडिट स्कोर खराब होण्याचे कारणे कोणती आहेत आणि तो चांगला ठेवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची माहिती घेऊ या.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे क्रेडिट कार्डवर खर्च केलेले पैसे खरे तर कर्ज असते आणि तुम्ही ते शक्य तितक्या लवकर परत करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत होते. कर्ज देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरता की नाही हे पाहण्यासाठी वित्तीय संस्था तुमच्या रेकॉर्डची तपासणी करतात. यामध्ये 30 दिवसांच्या विलंबामुळे क्रेडिट स्कोर 17 ते 37 अंकांनी घसरण्याची शक्यता असते.

Credit Card Use

Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? मग लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

क्रेडिट कार्डद्वारे मोठी खरेदी टाळा

क्रेडिट कार्ड असल्याने आपण बिनदिक्कतपणे खरेदी सुरू करतो. खरेदी करताना या गोष्टीचा विचार केला जात नाही. परंतु हे वित्तीय संस्थांना दाखवते की तुमचे क्रेडिट युटीलायझेशन रेशो जास्त आहे. म्हणजेच कर्जावरील तुमचे अवलंबित्व जास्त आहे असा अर्थ यामधून घेतला जातो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डमध्ये उपलब्ध मर्यादेच्या जवळ जवळ 30 टक्के खर्च करावा. शक्यतो क्रेडिट कार्डद्वारे मोठी खरेदी करणे टाळावे.

क्रेडिट कार्डद्वारे कर्जाचे हप्ते भरू नका

क्रेडिट कार्डद्वारे कर्ज भरणे (Loan Installment) म्हणजे कर्ज घेऊन कर्जाची परतफेड करणे असा याचा अर्थ होतो. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोरला अनावश्यकपणे नुकसान होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ही गोष्ट चांगली असू शकते. तुमचा क्रेडिट स्कोर थोडा वाढू शकतो परंतु क्रेडिट कार्डद्वारे कर्जाचे हप्ते भरणे शक्यतो टाळावे.

Credit Card Use

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड नको

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्यात काही अर्थ नाही. हे त्यांचे व्यवस्थापन करण्याची गोष्ट आहे आणि काही वेळा तुम्ही वेळेवर बिले भरण्याची शक्यता देखील कमी असते. वार्षिक शुल्कासारख्या खर्चाचा त्रास वेगळा राहील त्यातून उधळपट्टीचेही व्यसन वाढते. तुम्ही जुने क्रेडिट कार्ड बंद करून नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल तरीही त्यात तीन महिन्यांचे अंतर ठेवा. तुमचा क्रेडिट स्कोर खराब असल्यास तुम्ही तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ वाट पाहू शकता.

Credit Score Details : क्रेडिट स्कोर खराब झालाय? मग, सुधारण्यासाठी ‘इतके’ वर्ष थांबा; अहवालात खुलासा

क्रेडिट कार्ड बंद करताना काळजी घ्या

अनेकदा लोकांकडे दोन क्रेडिट कार्ड असतात. त्यातील ते एक बंद करतात पण ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. हे तुमचे क्रेडिट युटीलायझेशन रेशो वाढवू शकते. जे आधी दोन कार्डमध्ये विभागले गेले होते. पण एक कार्ड बंद केल्याने संपूर्ण भार दुसऱ्या कार्डवर पडेल यामुळे क्रेडिट स्कोर खराब होण्याची शक्यता राहते. अशा परिस्थितीत तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्याआधी कार्ड जारीकर्त्यांशी विचार विनिमय करा आणि ते वार्षिक शुल्क नसलेल्या कार्डमध्ये डाऊनग्रेड केले जाऊ शकते का? हे देखील तपासून पहा.

Leave a Comment