Credit Card Rules : क्रेडिट कार्डधारकांनो, आजपासून बदलले ‘हे’ महत्त्वाचे नियम; आर्थिक फटका बसण्यापूर्वी जाणून घ्या

Credit Card Rules : सध्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. आज काही बँकांनी क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले आहे. आर्थिक फटका बसण्यापूर्वी जाणून घ्या.

SBI बँक क्रेडिट कार्ड

जेव्हा सरकारशी संबंधित व्यवहार SBI क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येतात त्यावेळी त्यावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. पण हे लक्षात घ्या की आजपासून अशा सरकारी व्यवहारांवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. SBI च्या ज्या क्रेडिट कार्डांमध्ये ही सुविधा बंद करण्यात येणार आहे त्यात SBI कार्ड Elite, SBI Card Elite Advantage इत्यादींचा समावेश असेल.

ICICI बँक क्रेडिट कार्ड

तुम्ही ICICI बँकेचे Amazon Pay क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आता तुम्हाला 18 जूनपासून कोणत्याही भाड्याच्या पेमेंटवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. यापूर्वी, भाडे भरण्याच्या किमतीच्या एक टक्के रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध होते.नियमानुसार, आता या क्रेडिट कार्डच्या वापरकर्त्यांना इंधन अधिभार पेमेंटवर एक टक्के सवलत मिळेल.

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड

Swiggy HDFC क्रेडिट कार्डच्या कॅशबॅकशी संबंधित नियमही जूनपासून बदलणार असून समजा तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे हे क्रेडिट कार्ड वापरत असल्यास तुम्हाला त्याबद्दल माहिती असावी लागते. नवीन नियमानुसार, स्विगी ॲपवर स्विगी मनीमध्ये पैसे जमा केले तर मिळणारा कॅशबॅक आता पुढील महिन्याच्या कार्ड स्टेटमेंट बॅलन्समध्ये समायोजित करण्यात येईल. हा 21 जूनपासून नियम लागू होणार आहे.

BoB क्रेडिट कार्ड

बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना आता उशीरा पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. विहित मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क =भरावे लागेल. बँक ऑफ बडोदाचे हे नियम २३ जूनपासून लागू होईल.

या बँकांचे बदलणार नियम

  • येस बँक क्रेडिट कार्ड युटिलिटी व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क बदलतील.
  • समजा तुमच्याकडे IDFC First Bank क्रेडिट कार्ड असेल आणि त्याद्वारे 20,000 रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिल भरले तर तुम्हाला एक टक्के शुल्क आणि GST भरावा लागणार आहे.

Leave a Comment