Credit Card : हल्ली क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे. क्रेडिट कार्ड तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला त्याचे सर्व माहिती असावे लागतात. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
अनेक वापरकर्ते त्यांच्यावरील उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्सच्या लोभापोटी क्रेडिट कार्डचा जास्त वापर करतात. बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत त्यांना फारशी माहिती नसते.
परदेशातील व्यवहार शुल्क
परदेशात क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर विदेशी व्यवहार शुल्क आकारण्यात येते. हा चार्ज खूप मोठा असून तुम्ही आंतरराष्ट्रीय सहलीवर जात असाल तर तुम्हाला किती विदेशी व्यवहार शुल्क द्यावे लागेल याची तुम्हाला बँकेकडून खात्री करून घ्यावी लागणार आहे.
वार्षिक शुल्क
अनेक कंपन्या वापरकर्त्यांकडून क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क आकारत असून सर्व बँका आणि कंपन्या वेगवेगळे शुल्क आकारतात. वापरकर्त्याने मर्यादेपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरले तर वार्षिक शुल्क परत केले जाते. जर बँक वार्षिक शुल्क आकारत असल्यास वापरकर्त्याने सर्व बँकांची तुलना करावी किंवा मोठी गरज असेल त्यावेळी कार्ड घ्यावे.
क्रेडिट कार्डवरील व्याज
समजा वापरकर्त्याने क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर बँक त्यावर व्याज आकारत असते. हे व्याज टाळण्यासाठी, वापरकर्त्याला क्रेडिट कार्डची किमान रक्कम भरावी लागणार आहे. अशा वेळी वापरकर्त्याने क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेपूर्वी भरावे असा सल्लाही तज्ञ देतात. त्यांनी तसे केले नाही तर त्यांना 40 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाऊ शकते.
क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नये
समजा तुम्हाला रोखीची गरज असेल तर तुम्ही कधीही क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नये. कारण जर तुम्ही पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला त्यावर शुल्क भरावे लागणार आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड बिल भरेपर्यंत, व्याज जमा होते. अशा वेळी सर्व मार्ग बंद होईपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढू नये.
अधिभार
हे लक्षात घ्या की क्रेडिट कार्ड कंपन्या आणि बँका तेल भरण्यासाठी अधिभार आकारत असतात. अनेक बँका हा अधिभार परत करतात. समजा तुमची बँक हा अधिभार परत करत नसेल, तर तुम्ही बँकेकडे एकदा स्पष्टीकरण द्यावे. कार्ड घेण्यापूर्वी तुम्हाला एकदा अधिभाराची माहिती घ्यावी लागणार आहे.