Cow Milk Rate : दूध उत्पादकांना मोठा दिलासा! सरकारने जाहीर केले नवीन दर

Cow Milk Rate : राज्यात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. पशुपालनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. पण मागील काही दिवसांपासून दुधाला अपेक्षित दर नसल्याने पशुपालकवर्ग कमालीचा नाराज झाला आहे.

इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाले होते, त्यामुळे राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता. अशातच आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव आणि सरकारकडून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेण्यात आला आहे.

हे लक्षात घ्या की राज्यात दुधाचे नवीन दर 1 जुलै पासून लागू असणार आहेत. याबाबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत निवेदन दिले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघ, आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीने एक बैठक घेत दूध उत्पादक शेतकरी, आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये भाव देण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच पाच रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार वर्ग करणार आहे.

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरची मागणी कमी झाले असल्याने दर घसरत चालले आहेत. यामुळे राज्यात दूध भुकटीचा साठा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. राज्यातील जे दूध प्रकल्प भुकटी निर्यात करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलोसाठी 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानाची ही मर्यादा 150 हजार टनासाठी असणार आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

Leave a Comment