दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात केंद्रातील मोदी सरकारला जोरदार धक्का बसला आहे. देशाच्या परकीय चलन साठ्यात सर्वात मोठी साप्ताहिक घसरण झाली आहे. जागतिक भू-राजकीय घडामोडींमुळे चलनावर दबाव आल्याने देशाचा परकीय चलन साठा $11.173 अब्ज डॉलरने कमी होऊन $606.475 अब्ज राहिला आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी आपल्या आकडेवारीत ही माहिती दिली. याआधी, 25 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात परकीय चलन साठा $2.03 अब्ज डॉलरने कमी होऊन $617.648 अब्ज झाला होता.
शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आरबीआयच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, परकीय चलन साठ्यातील घसरण परकीय चलन मालमत्ता (एफसीए) कमी झाल्यामुळे होत आहे. परकीय चलन मालमत्ता एकूण परकीय चलन साठ्यातील एक महत्वाचा घटक आहे. आकडेवारीनुसार, मालमत्तेत $10.727 अब्ज डॉलरने घसरण होऊन $539.727 अब्ज झाले. डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या विदेशी चलन साठ्यामध्ये ठेवलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये युरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर अमेरिकन चलनांमधील मूल्यवृद्धी यांचा समावेश होतो.
सहसा, RBI आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातून डॉलर्स विकून मनी मार्केटमधील अस्थिरता कमी करण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करते. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे चलन बाजारात समस्या निर्माण झाल्या आहेत. याआधी, 11 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात, $ 9.6 बिलियनची सर्वाधिक घट झाली होती. सोन्याच्या साठ्याचे मूल्यही सप्ताहात $507 दशलक्षने कमी होऊन $42.734 अब्ज झाले.
नव्या वर्षात खुशखबर..! घटत चाललेला परकीय चलन साठा वाढला; फक्त सात दिवसात ‘इतक्या’ डॉलरची पडली भर