corona : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. मात्र, सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे (Corona) 6 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 6,298 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर देशभरात या महामारीमुळे 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत कोविड 19 मधून 5,916 लोक बरे झाले आहेत. कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आता 46 हजार 748 वर पोहोचले आहेत. त्यांची संख्या 359 वर पोहोचली आहे.
देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 45 लाख 22 हजार 777 कोरोना व्हायरसचे () रुग्ण आढळले आहेत. मृतांचा आकडा आता 5 लाख 28 हजार 273 वर पोहोचला आहे. याशिवाय 4 कोटी 39 लाख 47 हजार 756 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी चार जण केरळचे होते. सध्या, अॅक्टिव्ह प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी केवळ 0.1 टक्के आहेत तर पुनर्प्राप्तीचा दर (Recovery Rate) 98.71 टक्के आहे. याशिवाय, दैनिक सकारात्मकता दर (Positivity Rate) 1.89 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 1.70 टक्के आहे.
देशात कोरोना विरुद्ध लसीकरण (Vaccination) मोहीम सुरू आहे. आतापर्यंत देशात 216 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. पहिला डोस 102 कोटींहून अधिक लोकांना देण्यात आला आहे. 94.61 कोटी पेक्षा जास्त दुसरा डोस देण्यात आला आहे. याशिवाय, खबरदारीच्या डोसचा आकडा 19 कोटींच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 19 लाख 61 हजार 896 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था एएफपीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organisation) प्रमुख डॉ. घेब्रेयेसस यांनी बुधवारी (14 सप्टेंबर 22) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने आजसारखी सकारात्मक स्थिती (Positive Sign) आतापर्यंत कधी दिसली नाही. कोरोना लवकरच संपुष्टात येऊ शकतो. पण त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. आपण संधीचा फायदा घेतला नाही तर आपणाला आणखी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा (Variant) सामना करावा लागू शकतो. यातून मृत्युंची संख्या वाढू शकते, आणखी अडथळे येतील आणि अधिक अनिश्चिततेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.