Corona Virus: देशात हाहाकार माजवणारा कोरोना विषाणूच्या पुन्हा एकदा जोर पकडला आहे. मागच्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या दुप्पट रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन जणांचा मृत्यू देखील झाला आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने सरकार आणि आरोग्य विभाग चिंताग्रस्त झाले आहेत. असे मानले जाते की केंद्र सरकारच्या वतीने केंद्र पुन्हा एकदा राज्यांना कोरोना विषाणू संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करू शकते.
देशातील सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची
देशातील सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. काल म्हणजेच मंगळवारी येथे कोरोना विषाणूचे 155 रुग्ण आढळले आहेत. जे सोमवारी आढळलेल्या प्रकरणांपेक्षा दुप्पट आहे. महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 61 रुग्ण आढळले. यासह आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 81 लाख 38 हजार 653 रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एका दिवसात कोरोना विषाणूतून बरे झालेल्यांची संख्या 68 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 79,89,565 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
तरीही सक्रिय प्रकरणांची संख्या 662 वरच आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर पुण्यात सर्वाधिक (206) रुग्ण आढळले आहेत. मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे कोरोनाचे 144 रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, ठाण्यात कोविडचे 98 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 5166 चाचण्या करण्यात आल्या आहेत.