Corona Vaccination : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Patient) सातत्याने घट होत आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 4,129 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी, या कालावधीत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये (Kerala) 24 तासांत सर्वाधिक 13 मृत्यू झाले आहेत.
25 सप्टेंबरच्या तुलनेत कोरोनाचे 579 रुग्ण कमी आले आहेत. मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत 4,688 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 43,415 वर आली आहे. देशातील कोरोनाचे एकूण रुग्ण 4 कोटी 45 लाख 72 हजार 243 वर पोहोचले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 40 लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत 5 लाख 28 हजार 530 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह प्रकरणे 0.10 टक्के आहेत. तर रिकव्हरी दर (Recovery Rate) 98.72 टक्क्यांवर गेला आहे. दैनिक सकारात्मकता दर 2.51 टक्के आहे तर साप्ताहिक सकारात्मकता दर (Positivity Rate) 1.61 टक्के झाला आहे.
आतापर्यंत देशात 217.68 कोटीहून अधिक कोरोना लसीचे (Vaccine) डोस देण्यात आले आहेत. 102.61 कोटींहून अधिक लोकांना पहिला डोस मिळाला आहे. 94.76 कोटी पेक्षा जास्त दुसरा डोस देण्यात आला आहे. याशिवाय 20.29 कोटींहून अधिक लोकांना खबरदारीचे डोसही देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 11,67,772 लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) करण्यात आले.