दिल्ली – गेल्या 24 तासात देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सुमारे 1400 ने कमी झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे एकूण 15,940 नवीन रुग्ण (Corona New Patient) आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी देशभरात 17,336 नवीन प्रकरणे आढळून आली. तर 13 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गेल्या 24 तासात मृतांची संख्या 20 वर गेली आहे. दरम्यान, अॅक्टिव्ह रुग्णांची (Corona Active Patient) संख्या 90 हजारांच्या पुढे गेली आहे, जी चिंताजनक आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 15,940 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात कोरोनाचे 91,779 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत आणि दैनंदिन सकारात्मकतेचा दर (Positivity Rate) 4.39% आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 12425 लोक बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 62 हजार 481 लोक कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 5 लाख 24 हजार 974 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा लवकरच 5.25 लाखांवर जाईल. अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. शेवटच्या अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत देशातील कोविड-19 लसीकरण (Covid 19 Vaccination) 196.94 कोटी (1,96,94,40,932) झाले आहे. 12-14 वयोगटासाठी कोविड-19 लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू झाले. आतापर्यंत 3.62 कोटींहून अधिक (3,62,20,781) युवकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 18-59 वयोगटातील सावधगिरीचा डोस देखील 10 एप्रिल 2022 रोजी सुरू करण्यात आला.
Corona Update : कोरोना इतक्यात थांबणार नाहीच; मागील 24 तासांत सापडले ‘इतके’ रुग्ण