दिल्ली – देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरूच आहे. गुरुवारी 2364 नवीन बाधित आढळले, तर बुधवारी 1829 नवीन रुग्ण आढळले होते. त्याच वेळी, मंगळवारी 1569 नवीन रुग्णांची (New Corona Patient) नोंद झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून नवीन बाधितांची संख्या वाढत (Increase In New Patient) आहे. मात्र, नव्याने संक्रमित झालेल्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
गेल्या 24 तासांत 2582 जणांनी कोरोनावर मात केली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये (Active Patient) 228 ची घट झाली असून त्यांची संख्या 15 हजार 419 आहे. साथीच्या आजाराने आणखी 10 मृत्यूंसह देशातील एकूण मृत्यूंची संख्या 5,24,303 वर गेली आहे.
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. 26 एप्रिलपासून दररोज 3 हजारांहून अधिक प्रकरणे सापडत होती. जे 29 एप्रिलला सर्वाधिक पातळीवर होते. तेव्हापासून प्रकरणांमध्ये घट झाली आहे. 26 एप्रिलनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एकूण प्रकरणांची संख्या 3 हजारांच्या खाली गेली आहे. 26 एप्रिल रोजी 2927 प्रकरणे नोंदली गेली. त्यानंतर 27 एप्रिलला 3303, 28 एप्रिलला 3377, 29 एप्रिलला 3688, 30 एप्रिलला 3324 आणि 1 मे रोजी 3157. काल कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या 3 हजारांच्या आत होती. मे महिन्यात मात्र कोरोनाचे रुग्ण कमी जास्त होत आहेत.
देशात सध्या कोरोना नियंत्रणात आहे. लसीकरणाचे प्रमाण (Vaccination) वाढले आहे. तरी देखील काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. राजधानी दिल्लीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत येथे जास्त संख्येने रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे या घातक आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
कोरोनाचे जबरदस्त थैमान..! एकाच दिवसात सापडले अडीच लाख रुग्ण; पहा, कुठे आहे ‘ही’ भीषण परिस्थिती